चित्र-चरित्र

प्रिया बापट
प्रिया बापट
अभिनेत्री व मॉडेल
१८ सप्टेंबर १९८६

मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी आणि त्यांच प्रमाणे रंगमंचावरील हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. प्रियाचा जन्म मुंबई झाला. दादरच्या बालमोहन विद्यामंदिरातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबईतील रामनारायण रूईया महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले त्यानंतर सोफिया महाविद्यालयातून पदवीत्युर शिक्षण पूर्ण केले. 2000साली प्रदर्शित झालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटात साकरलेल्या छोट्या रमाबाईच्या रुपाने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यानंत दामिनी , दे धमाल, आभाळमाया, अधूरी एक कहानी, बंदिनी, शुभंमकरोती या मालिकेच्या माध्यमातून ती प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अभिनेता उमेश कामत यांच्या सोबत लग्न केल्यावर तिच्या अभिनय विश्वाला कलाटणी मिळाली. उमेश कामतसोबत नवा गडी नवे राज्य या नाटकाच्या माध्यमातून पहिल्यांदा ही जोडी प्रेक्षकांसमोर आली. 2009 साली प्रदर्शित झालेल्या मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटांतून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. आनंदी आनंद(2010), काकस्पर्श (2013), नवा गडी , नवे राज्य या नाटकावर आधारीत टाईम प्लीज (2014) या चित्रपटातून रियल लाईफ जोडी मोठ्या पडद्यावर आली. आंधळी कोशिंबीर(2014), लोकमान्य- एक युगपुरुष (2015), वजनदार (2016) हिंदीतील मुन्नाभाई एमबीबीएस आणि लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटातील प्रियाची भूमिकाही लक्षवेधी होती. काकस्पर्शतील भूमिकेसाठी प्रियाला 2013 सालचा स्क्रिन अवार्डचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.हॅपी जर्नी या चित्रपटासाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुस्कार मिळाला. 2014 सालच्या मराठी फिल्मफेअरमध्ये उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी प्रियाला नामांकन मिळाले.

पिंपळ (२०१७), गच्ची (२०१७), दोघी (२०१८) हे प्रियाचे अलीकडच्या काळातले उल्लेखनीय मराठी चित्रपट. २०२१ मधील 'सिटी ऑफ ड्रीम्स' या हिंदी वेबसीरिजमधील तिचा अभिनयदेखील गाजला.

-मंदार जोशीचित्र-चरित्र