चित्र-चरित्र

वैशाली सामंत
वैशाली सामंत
पार्श्वगायिका
२५ एप्रिल

मराठी चित्रपटसृष्टी, हिंदी चित्रपटसृष्टी, अल्बम, स्टेज शोज गाजविणारी हरहुन्नरी पार्श्वगायिका म्हणजे वैशाली सामंत. गेली दोन दशके वैशालीने आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून तिने गायनाचं शिक्षण सुरू केलं. ज्योत्स्ना मोहिले, जयंत दातार, पं. मनोहर चिमोटे यांच्याकडे ती गाणं शिकली. ‘सागरिका म्युझिक’च्या ‘ऐका दाजिबा’ या अल्बममधून तिला मोठी प्रसिद्धी मिळाली. वैशालीने आतापर्यंत मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, भोजपुरी, आसामी, तमीळ, तेलुगु आदी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. मराठीमध्ये तिची दोन हजारांहून अधिक गाणी आहेत. ‘ऐका दाजिबा’, ‘दूरच्या रानात’, ‘नाद खुळा’, ‘कोंबडी पळाली’ ही तिची अत्यंत गाजलेली गाणी. पार्श्वगायनाखेरीज वैशालीनं ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘गलगले निघाले’, ‘मस्त चाललंय आमचं’ या चित्रपटांनाही संगीत दिलं आहे. ए. आर. रेहमान, डब्बू मलिक, विजू शाह या हिंदीतील प्रसिद्ध संगीतकारांकडेही ती गायली आहे.

‘गडबड गोंधळ’, ‘माधुरी’, ‘गर्भ’ हे वैशालीचे पार्श्वगायन असलेले अलीकडचे चित्रपट. सुवासिनी, वेसावीचे पारू या अल्बमसाठीही तिनं पार्श्वगायन केलं. २०२२ मध्ये वैशाली सामंत यांनी 'धोंडी चंप्या एक प्रेमकथा' या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले होते

- मंदार जोशीचित्र-चरित्र