चित्र-चरित्र

शशांक पोवार
शशांक पोवार
संगीतकार
७ मार्च १९७६

शशांक मूळचा कोल्हापूरचा. अनेक मराठी दूरचित्रवाणी मालिकांची शीर्षकगीते, चित्रपटगीते , मराठी संगीत अल्बम इत्यादी माध्यमांतून त्याने संगीत दिले आहे. ‘झी मराठी’वरील ‘कुंकू’ या मालिकेसाठी याने चाल दिलेले शीर्षकगीत विशेष गाजले. याशिवाय ‘झी मराठी’वरील ‘नक्षत्रांचे देणे’ या प्रसिद्ध कार्यक्रमासाठी विंदा करंदीकर आणि ना.धों. महानोर यांच्या गीतरचना याने संगीतबद्ध केल्या आहेत. शशांक पोवार याचे सांगीतिक शिक्षण संगीत अलंकार पदवीपर्यंत झाले आहे. ‌‘धनी कुंकवाचा’, ‘झुंजार’, ‘निष्कलंक’, ‘झुंज एकाकी’, ‘माहेरची माया’, ‘अपराध’, ‘प्रेम’, ‘मोलकरीण’, ‘आबा झिंदाबाद’, ‘राजमाता जिजाऊ’, ‘संभा’, ‘हायकमांड’ आदी चित्रपटांना त्याने संगीत दिले आहे.

'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेला शशांक यांनी संगीत दिले आहे.

-मंदार जोशी



चित्र-चरित्र