चित्र-चरित्र

पु. भा. भावे
पु. भा. भावे
पटकथालेखक
१२ एप्रिल १९१० --- १३ ऑगस्ट १९८०

पुरुषोत्तम भास्कर भावे हे मराठीतले एक सिद्धहस्त लेखक होते. अनेक कथा संग्रह त्यांच्या नावावर आहेत. मराठीतले ते एक नवकथाकार म्हणून ओळखले जातात. व्याध, पिंजरा, रोहिणी या त्यांच्या कादंबऱ्यांचे रसिकांनी स्वागत केलं. या नंतर भावे नाट्यलेखनाकडे वळले. स्वामिनी, विषकन्या आणि महाराणी पदमिनी ही त्यांची तीन नाटकं. यातले पदमिनी हे नाटक प्रभाकर पणशीकर यांनी रंगमंचावर आणले. पुरुषोत्तम दारव्हेकर या नाटकाचे दिग्दर्शक होते. भाव्यांचे हे नाटक चांगलेच गाजले. भावे चित्रपट लेखनाकडे वळले नाहीत. पण यात चित्रपट लेखक ग. दि. माडगूळकर त्यांचे जवळचे मित्र होते. माडगूळकरांनी भाव्यांची कथा 'सौभाग्य' चित्रपटासाठी घेतली. 'सौभाग्य' १९५३ साली प्रकाशीत झाला. दत्ता धर्माधिकारींनी त्याचे दिगदर्शन केले होते. पटकथा, संवाद, गीते हे ग. दि. माडगूळकरांनी लिहले व त्याते संगीत सुधीर फडके यांचे होते. त्याचवर्षी पुण्याच्या नवयुग स्टुडिओवर पु. ल. देशपांडे यांनी लिहलेला 'अंमलदार' (१९५३) या चित्रपटाचे शूटिंग चालू होते. के. नारायण काळे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. त्यात भावेंनी माडगूळकरांच्या बरोबर छोटीशी भूमिकाही केली. १९६० नंतर भावे डोंबिवलीत राहायला आले. त्यानंतर त्यांची कथा चित्रपटासाठी घेण्यासाठी निर्माते त्यांना आग्रह करू लागले. भावेंच्या 'अकुलीना' कादंबरीवर दिग्दर्शक अनंत मानेंनी आपला माझा होशील का ? (१९६३) हा चित्रपट बेतला आणि भावेंनी प्रथमच चित्रपटासाठी पटकथा संवाद लिहले. त्यानंतर द. ग. गोडसे यांनी आग्रह करून भावेंनी त्यांच्या कथेवरून 'रायगडचा राजबंदी' ( १९६५) साली पटकथा, संवाद लिहले. दिग्दर्शक होते राजा ठाकूर पण यातला कोणताही चित्रपट फारसा गाजला नाही आणि भावेंचा चित्रपट लेखनाचा उत्साह मावळला.



चित्र-चरित्र