मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळे प्रयोग करणारा सध्याचा आघाडीचा दिग्दर्शक म्हणजे विजू माने. गेल्या दशकभरात श्री. माने यांनी आपला प्रत्येक चित्रपट वेगळा राहील याची काळजी घेतली आहे. ‘गोजिरी’, ‘ती रात्र’, ‘मंकी बात’, ‘शिकारी’, ‘डॉटर’, ‘शर्यत’ या सर्व चित्रपटांमधून श्री. माने यांनी वेगळे विषय हाताळले आहेत. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘शिकारी’ हा पहिला मराठी अॅडल्ट-रहस्य-कॉमेडी चित्रपट होता. ‘मंकी बात’ या बालचित्रपटाला थराराची जोड देण्यात आली होती. ठाण्याचे रहिवाशी असलेले श्री. माने जाहिरातींचंही दिग्दर्शन करतात. ‘रेगे’ या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला होता. ‘बायोस्कोप’ या चार दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या प्रयोगामधील एक कथा श्री. माने यांनी दिग्दर्शित केली होती.
विजू माने यांनी २०२१ मध्ये दिग्दर्शित केलेल्या 'पांडू' या चित्रपटाला मोठे यश मिळाले होते.
-मंदार जोशी