चित्र-चरित्र

आदर्श शिंदे
आदर्श शिंदे
पार्श्वगायक
७ मार्च १९८८

आदर्श शिंदे हे एका समृद्ध गायनपरंपरा असलेल्या कुटुंबातून आले आहेत. पार्श्वगायक आनंद शिंदे हे त्यांचे वडील, मिलिंद शिंदे हे काका आणि गायक प्रल्हाद शिंदे हे त्यांचे आजोबा होत. आदर्श शिंदे यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून गाणे शिकायला सुरुवात केली. त्यांनी सुरेश वाडकर यांच्याकडून शास्त्रीय संगीतातील धडे घेतले आहे. आदर्श शिंदे यांनी आपल्या वडिलांच्या आणि काका मिलिंद शिंदे यांच्यासोबत अल्बममध्ये गायन करून करिअरची सुरुवात केली. ‘स्टार प्रवाह’ या दूरचित्रवाणीवरील ‘आता होऊन जाऊ द्या’ या रियालिटी शोमध्ये भाग घेतल्याने लोक त्यांना ओळखू लागले. २०१४ मध्ये "शिंदे" कुटुंबाने प्रियतमा या चित्रपटासाठी एकत्र गायन केले. तीन पिढ्यांचे एकत्र पार्श्वगायन ही मराठी चित्रपट उद्योगात घडलेली पहिलीच घटना होती. आदर्श शिंदे यांनी मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये १५०० हून अधिक गाणी गायली आहेत. ‘दुनियादारी’ चित्रपटामधील ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’ आणि ‘ख्वाडा’ चित्रपटातील ‘गाणं वाजू दे’ या गीताने शिंदे यांना मोठी लोकप्रियता मिळाली. ‘प्रियतमा’, ‘पोस्टर गर्ल’, ‘बाजी’, ‘दगडी चाळ’, ‘वायझेड’, ‘हलाल’, ‘रिंगण’ आदी चित्रपटांसाठीही त्यांनी पार्श्वगायन केले आहे. विविध रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक तसेच सूत्रसंचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

-मंदार जोशीचित्र-चरित्र