चित्र-चरित्र

नरेंद्र भिडे
नरेंद्र भिडे
संगीतकार
३ एप्रिल १९७२ --- ९ डिसेंबर २०२०

नरेंद्र भिडेंना कलेचा वारसा तीन दिग्गजांकडून मिळाला. चिंतामणराव कोल्हटकर, चित्तरंजन कोल्हटकर आणि बाळ कोल्हटकर हे तीन दिग्गज म्हणजे भिडेंचे आजोबा. भिडे यांनी बालपणापासून शास्त्रीय संगीताचे रीतसर शिक्षण घेतले. कालांतराने स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी घेतल्यानंतर त्यांनी कलाक्षेत्रात पदार्पण केले. सुरुवातीच्या काळात म्युझिक अॅरेंजर म्हणून काम करणाऱ्या भिडे यांनी कालांतराने चित्रपटांना स्वतंत्रपणे संगीत देण्यास सुरुवात केली. ‘त्या रात्री पाऊस होता’, ‘अ पेईंग घोस्ट’, ‘देऊळबंद’, ‘बायोस्कोप’, ‘चि. व सौ. कां’, ‘हंपी’, ‘उबुंटु’, ‘लेथ जोशी’, ‘पुष्पक विमान’ हे त्यांचे महत्त्वाचे चित्रपट. पुण्यातील ‘डॉन’ रेकॉर्डिंग स्टुडिओचे ते संचालक होते.

-मंदार जोशी



चित्र-चरित्र