गानसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या मीनाताई या भगिनी. कारकीर्दीच्या सुरुवातीला काही चित्रपटांमध्ये त्यांनी गायनही केलं. मात्र त्यांचा ओढा संगीत दिग्दर्शनाकडे होता. ‘माणसाला पंख असतात’, ‘रथ जगन्नाथाचा’, ‘शाबास सूनबाई’ आणि ‘चॅम्पियन’ या चित्रपटांना मीनाताईंनी संगीत दिलं आहे. परंतु, त्यांची खरी ओळख आहे ती बालगीतांसाठी. मीनाताईंनी संगीत दिलेली ‘सांग सांग भोलेनाथ’, ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’, ‘खोडी माझी काढाल तर’, ‘ए आई मला पावसात जाऊ दे’, ‘पुस्तक नंतर वाचा’ ही बालगीते खूप गाजली.
- मंदार जोशी