संगीत दिग्दर्शक, संगीत संयोजक, पार्श्वसंगीत दिग्दर्शक या नात्याने कमलेश भडकमकर गेल्या काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. `कृष्णाकाठची मीरा`, `पांढर`, `चकवा`, `मस्त कलंदर`, `एक उनाड दिवस`, `कधी अचानक`, `सासरची की माहेरची`, `ब्लाईंड गेम्स` आदी चित्रपटांचे पार्श्वसंगीत श्री. भडकमकर यांनी केलं आहे. `ताक धीना धिन`, `क्राईम डायरी`, `संडे टू संडे`, `मिनी सिनेमा`, `आता बोला`, `लाडकी` आदी मालिकांची शीर्षक गीतेदेखील भडकमकर यांनी संगीतबद्ध केली आहेत. `आधार` या चित्रपटाला त्यांनी स्वतंत्रपणे संगीत दिलं आहे. `नक्षत्रांचे देणे` या कार्यक्रमासह अनेक गाजलेल्या स्टेज शोचे संगीत संयोजन त्यांनी केलं आहे. श्रीनिवास खळे, दत्ता डावजेकर, स्नेहल भाटकर, यशवंत देव या दिग्गजांसह तरुण पिढीतील कौशल इनामदार, सलील कुलकर्णी या संगीतकारांबरोबर भडकमकर यांनी काम केलं आहे. कलांगण या संस्थेचे ते मानद सचिव आहेत.