लेख, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक अशी बहुआयामी प्रतिभा असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे अजेय झणकर. झणकर हे पुण्याचे. येथील फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत त्यांचा लेखनाला पुरस्कार मिळाला आणि त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. ‘सरकारनामा’ आणि ‘द्रोहपर्व’ या झणकर यांच्या दोन गाजलेल्या कादंबऱ्या. यापैकी ‘सरकारनामा’ कादंबरीवर याच शीर्षकाचा चित्रपट झणकर यांनी बनवला. १९९८ मधील या चित्रपटाला बरेच पुरस्कार तसेच प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभला. त्यानंतर झणकर यांनी ‘लेकरू’ हा चित्रपट लिहिला तसेच निर्मिला. या चित्रपटाचं दिग्दर्शन श्रावणी देवधर यांनी केलं होतं. ‘द्रोहपर्व’वर झणकर यांनी ‘सिंग्युलॅरिटी’ हा हॉलिवुड चित्रपट बनवला.
-मंदार जोशी