तुकाराम भाऊराव साठे हे अण्णा भाऊंचे पूर्ण नाव. अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांचे लेखन राजकीय कृतीशीलतेचे केंद्रबिंदू होते. अण्णाभाऊ साठेंचा जन्म १ ऑगस्ट इ.स. १९२० रोजी सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडीलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. साठे हे शाळेत शिकलेले नाही, केवळ दीड दिवस ते शाळेत गेले. नंतर तेथील सर्वणांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये फकिरा (१९५९) समाविष्ट आहे, त्याच्या सुमारे २० आवृत्या प्रकाशित झाल्या. जी १९व्या आवृत्तीत आहे आणि इ.स. १९६१ मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. साठेंच्या लघु कथांचा संग्रह १५ आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि २७ अ-भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, १२ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी लिहिली.
साठेंच्या पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये, साठेंनी आपल्या समुदायाला पूर्ण भुखमरीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढिवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरूद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकिराला चित्रित केले. साठे यांच्या बऱ्याच कथा-कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले. त्यापैकी महत्त्वाचे चित्रपट म्हणजे ‘फकिरा’, ‘डोंगरची मैना’, ‘मुरळी मल्हारी रायाची’, ‘टिळा लाविते मी रक्ताचा’, ‘वारणेचा वाघ’, ‘अशी ही साताऱ्याची तर्हा’, ‘चित्रा’. यापैकी ‘फकिरा’ चित्रपटाची कथा आणि संवाद साठे यांनी लिहिले होते. या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला होता.
- मंदार जोशी