इंग्रजी साहित्य आणि ड्रामाटिक्स या दोन विषयांमध्ये पदवीधर असलेल्या स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी कला क्षेत्रामध्ये गेल्या दोन दशकांमध्ये अतिशय उत्तम काम केले आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी बऱ्याच नाटकांमध्ये काम केलं. त्यानंतर हिंदी, गुजराती मालिकांचं दिग्दर्शन केलं. ‘कॅप्टन हाऊस’, ‘अहंकार’, ‘ऋणानुबंधम’, ‘कहानी घर घर की’, ‘तीन बहुरानियॉं’, ‘कहना है कुछ मुझको’, ‘रंग बदलती ओढणी’ या त्यांच्या उल्लेखनीय मालिका. गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीसाठी विशेष लक्षणीय काम केलं आहे. ‘दमादम’, ‘फुगे’, ‘लाल इश्क’, ‘तुला कळणार नाही’, ‘मितवा’ हे त्यांचे विशेष उल्लेखनीय चित्रपट. व्ही. शांताराम, गुलजार, गुरुदत्त आणि राज कपूर या दिग्दर्शकांचा त्यांच्यावर अधिक प्रभाव आहे.
'सविता दामोदर परांजपे' हा चित्रपटही रसिकांच्या पसंतीस उतरला होता.
-मंदार जोशी