चित्र-चरित्र

संजय जाधव
संजय जाधव
छायालेखक, दिग्दर्शक
१८ जुलै १९७०

छायालेखक ते यशस्वी दिग्दर्शक असा प्रवास संजय जाधव यांनी केला आहे. ठाण्यात शिकलेल्या जाधव यांनी प्रारंभीच्या काळात काही मराठी तसेच हिंदी चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले. त्यामधील उल्लेखनीय चित्रपट म्हणजे ‘सावरखेड एक गाव’, ‘सातच्या आत घरात’, ‘डोंबिवली फास्ट’, ‘जोगवा’ हे मराठी तर ‘मुंबई मेरी जान’, ‘सी कंपनी’ हे हिंदी चित्रपट. छायालेखक म्हणून चांगले काम केल्यानंतर ते मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शनाकडे वळले. सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी ‘चेकमेट’, ‘रिंगा रिंगा’ हे दोन चित्रपट दिग्दर्शित केले. परंतु, जाधव यांच्यातील दिग्दर्शक खऱ्या अर्थाने प्रेक्षकांसमोर आला ते ‘दुनियादारी’ या चित्रपटाने. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर जाधव यांनी ‘प्यारवाली लव्हस्टोरी’, ‘तू ही रे’, ‘गुरू’, ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘दुहेरी’ तसेच ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकांचीही त्यांनी निर्मिती केली.

चित्रपटसृष्टीत नव्याने येणाऱ्या तरुणाईसाठी या क्षेत्रातील सर्व विभागांचे प्रशिक्षण देणारी प्रशिक्षण स्कूल संजय जाधव यांनी मीरा रोड येथे नुकतीच सुरू केली आहे.

मंदार जोशीचित्र-चरित्र