चित्र-चरित्र

ओम राऊत
ओम राऊत
दिग्दर्शक
२१ डिसेंबर १९८२

ओमचे वडील भारतकुमार राऊत हे प्रख्यात संपादक तर आई नीना राऊत या माजी मुंबई दूरदर्शन केंद्रप्रमुख. त्यामुळे कला-संस्कृती आणि समाजकारणाचा वारसा त्याला घरातूनच मिळाला. शाळा-महाविद्यालयीन स्तरावर ओमला अभिनयाचा छंद होता. ‘करामती कोट’ (१९९३) या हिंदी चित्रपटात पहिल्यांदा तो झळकला होता. हा चित्रपट विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवात गाजला होता. इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतल्यानंतर ओमनं पुढील शिक्षण अमेरिकेत घेतलं. त्यानंतर काही काळ तिथंच ‘एमटीव्ही’मध्ये नोकरी केली. मुंबईत परतल्यानंतर त्याने काही वर्षं ‘दार मोशन पिक्चर्स’मध्ये काम केलं. या चित्रपट संस्थेसाठी त्यानं ‘लालबाग परळ-सिटी ऑफ गोल्ड’ या मराठी आणि ‘हॉंटेड’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. त्यानंतर ओम दिग्दर्शनाकडे वळला. दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात त्यानं लोकमान्य टिळकांवर आधारलेला ‘लोकमान्य - एक युगपुरुष’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. सध्या तो तानाजी मालुसरेंवर एक हिंदी चित्रपट करीत आहे. अजय देवगण मुख्य व्यक्तिरेखेत आहे.

-मंदार जोशीचित्र-चरित्र