चित्र-चरित्र

अश्विनी शेंडे
अश्विनी शेंडे
गीतकार
५ जानेवारी

मालिकांची शीर्षकगीते, चित्रपट गीतकार, पटकथा-संवादलेखन यामधील सध्याचे आघाडीचे नाव म्हणजे अश्विनी शेंडे. बोरिवलीच्या सुविद्या विद्यालयातून तिचं प्राथमिक शिक्षण झालं तर साठे महाविद्यालयातून तिनं मराठी विषयात बी.ए. ही पदवी घेतली. पदवी घेतल्यानंतर तिनं काही काळ पत्रकारिता केली. याचवेळी तिची संगीतकार निलेश मोहरीर यांच्याशी ओळख झाली आणि तिची कला क्षेत्रामधील कारकीर्द घडण्यास सुरुवात झाली. ‘यंदा कर्तव्य आहे’ हा तिचा गीतलेखिका म्हणून पहिला चित्रपट. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘कळत नकळत’ मालिकेचे तिने लिहिलेले शीर्षकगीत लोकप्रिय ठरले. कालांतराने तिने या मालिकेचे संवादही लिहिले. ‘कुलवधू’, ‘अनुबंध’, ‘रामराम महाराष्ट्र’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘तुजवीण सख्या रे’, ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘घाटगे अॅंड सून’ या तिच्या गाजलेल्या मालिका. ऐंशी मालिकांची शीर्षकगीते तसेच ‘मुंबई पुणे मुंबई’, ‘मितवा’, ‘देवा’, ‘व्हॉअसअप लग्न’, ‘तुझी माझी लव्हस्टोरी’, ‘वन वे तिकीट’ चित्रपट मालिकेसह बरेच चित्रपट सध्या तिच्या नावावर जमा आहेत.

अश्विनी शेंडे ह्यांनी २०२१ मध्ये 'सुखी माणसाचा सदरा' ह्या मालिकेचे लेखन केले.

-मंदार जोशीचित्र-चरित्र