भारतीय सिनेमातील समांतर चळवळीतील एक प्रमुख नाव, म्हणजे गोविंद निहलानी. चित्रपटसृष्टीत गोविंद निहलानी यांनी कॅमेरामन म्हणून सुरुवात केली. ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार विजय तेंडुलकर यांच्या ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या कलाकृतीवर तो आधारीत होता. दिग्गज कॅमेरामन व्ही.के. मूर्ती यांचे सहाय्यक असलेल्या गोविंद निहलानी यांनी श्याम बेनेगल यांच्या सर्व चित्रपटांसाठी कॅमेरा संभाळला. गोविंद निहलानी हेच रिचर्ड एटनबरो यांच्या ऑस्कर विजेता चित्रपट ‘गांधी’ चित्रपटासाठी कॅमेरामन होते. १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांनी चित्रपटनिर्मिती सुरू केली. दूरचित्रवाणी माध्यमांतही त्यांनी कार्य केले आहे. गोविंद निहलानी यांनी ‘देव’, ‘तक्षक’, ‘हजार चौरासी की माँ’, ‘संशोधन’, ‘द्रोहकाल’, ‘दृष्टी’, ‘तमस’, ‘आघात’, ‘पार्टी’, ‘अर्धसत्य’, ‘विजेता’, ‘आक्रोश’ अशा एकापेक्षा सरस चित्रपटांतून सामाजिक वास्तवाला हात घातला आहे. निहलानी यांचे चित्रपट पाहणे, हा संपन्न अनुभव असतो. २०१४ मध्ये त्यांनी गजेंद्र अहिरे यांच्या ‘अनुमती’ चित्रपटासाठी छायालेखक म्हणून काम केलं होतं. या वर्षी निहलानींनी 'ती आणि इतर' हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला आहे.