चित्र-चरित्र

मंदार देवस्थळी
मंदार देवस्थळी
निर्माता-दिग्दर्शक
७ फेब्रुवारी

मंदार देवस्थळी हे मराठी मालिका क्षेत्रामधील अतिशय मोठे नाव. गेल्या दोन दशकांमध्ये मंदारने निर्मिती-दिग्दर्शन केलेल्या अनेक मालिकांनी लोकप्रियतेचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे. मंदारने आपल्या कारकिर्दीची सुरुवात एक सहाय्यक दिग्दर्शक म्हणून १९९०च्या दशकात केली. तब्बल दशकभराच्या संघर्षानंतर २००० मधील ‘आभाळमाया’ मालिकेने त्याला पहिले मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. ‘अवंतिका’, ‘वादळवाट’, ‘अग्निहोत्र’ या त्याच्या गाजलेल्या मालिका. ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘माझे पती सौभाग्यवती’ या दोन मालिकांची त्याने निर्मितीदेखील केली. ‘क्षण’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मंदारने केले होते. तसेच ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाची निर्मितीही मंदारने केली होती. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

२०२३ मध्ये देवस्थळी यांनी दिग्दर्शित केलेली 'हृदयी प्रीत जागते' ही मालिका यशस्वी ठरली.

-मंदार जोशी



चित्र-चरित्र