अरुण गोडबोलेंचा जन्म साताऱ्याचा. तिथेच त्यांचं शालेय शिक्षण झालं आणि आपली कारकीर्दही त्यांनी याच क्षेत्रात घडवली. गोडबोले यांचं उच्च शिक्षण वाणीज्य शाखेत पुण्यात झालं. वडिलांबरोबर त्यांनी कर सल्लागार म्हणून आपली कारकीर्द घडवली. त्यांना आपल्या वडिलांकडून सार्वजनिक कार्याचा वारसा मिळाला. करसल्लागार म्हणून काम करीत असताना गोडबोले यांचे पुण्यातील साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रामधील मान्यवरांशी चांगले संबंध निर्माण झाले. सतत नावीन्याचा ध्यास असल्याने गोडबोल यांनी चित्रपट निर्मितीमध्ये पदार्पण केले ते आपल्या कौशिक चित्र या बॅनरद्वारे. या चित्रपटाच्या साताऱ्यातील प्रीमियर शोला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी उपस्थित होते. या संस्थेमार्फत त्यांनी ५ मराठी आणि एका हिन्दी चित्रपटाची निर्मिती केली. कशासाठी प्रेमासाठी, नशीबवान, धुमाकूळ, बंडलबाज आणि राम रहीम हे ते पाच मराठी चित्रपट. ‘बंडलबाज‘चा हिन्दी अवतार ‘हम दो बंडलबाज‘. राम रहीम या चित्रपटाची कथा, संवाद आणि गीते गोडबोले यांनीच लिहिली होती. आपल्या चित्रपट निर्मितीबाबत त्यांनी सिनेमाचे दिवस हे पुस्तकही लिहिले आहे.
- मंदार जोशी