चित्र-चरित्र

ज्ञानेश भालेकर
ज्ञानेश भालेकर
कथा-पटकथा-संवाद लेखक, दिग्दर्शक
४ जून

ज्ञानेश भालेकर हे चित्रपट व दूरदर्शन मालिकांचे दिग्दर्शक असून त्यांनी यापूर्वी 'कॉमेडी एक्सप्रेस', 'आंबटगोड', 'माधुरी मिडलक्लास', 'कोपरखळी', 'साहेब बीबी आणि मी' अशा ५० मराठी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. 'श्रीमान श्रीमती', कभी इधर कभी उधर', 'घरोंदा' अशा हिंदी मालिकांचे ते प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक होते. 'गोलमाल', 'बेधुंद' अशा मराठी चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. ‘कॉमेडी एक्स्प्रेस’चे ५०० हून अधिक त्यांनी केले आहेत. 'गीतसुगंध' या संगीत कार्यक्रमाची सर्वेसर्वा अक्षदा विचारे या त्यांच्या भगिनी व ज्ञानेश भालेकर यांचे वडील शिवाजी मंदिरचे उपाध्यक्ष आणि मुक्त पत्रकार शशिकांत भालेकर हे होत. शशिकांत भालेकर यांचे २९ मे २०२० रोजी निधन झाले.
- संजीव वेलणकर, पुणे



चित्र-चरित्र