चित्र-चरित्र

प्रभाकर नायक
प्रभाकर नायक
दिग्दर्शक, गीतलेखक, अभिनेता
१ जून १९२० --- २५ मे १९८६

साधारण १९४२ मध्ये नवयुग सिनेटोनमध्ये प्रोजेक्शनिस्ट म्हणून प्रभाकर नायक यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. नंतर त्यांनी काही छोट्या-मोठ्या भूमिका केल्या आणि नजम नकवी यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. त्या वेळी नकवींच्या ‘पन्ना’, ‘पारो’, ‘कमरा नं.१०१’ या गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी छोट्या भूमिकाही केल्या. प्रभातच्या गाजलेल्या ‘कीचकवध’ या चित्रपटात प्रभाकर नायकांनी तरुण वयात ‘कंचुकी’ या जख्ख म्हातार्‍याची छोटीशी पण लक्षवेधी भूमिका केली.ते उत्तम नट होते.१९४७ साली नजम नकवी पाकिस्तानात गेल्यानंतर शौरी, भालजी पेंढारकर यांच्याकडे सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले. १९५८ साली त्यांनी ‘पुनर्जन्म’ या चित्रपटाद्वारे स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून कामाला सुरवात केली. त्यांनी अनेक चित्रपट दिग्दर्शित केले. त्यातले ‘पाठराखीण’, ‘खंडोबाची आण’, ‘थापाड्या’ (रौप्यमहोत्सवी), ‘चांडाळ चौकडी’ ‘पटलं तर व्हय म्हणा’ इ. महत्त्वाचे चित्रपट.काही चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखनही केले. तसंच नंतरच्या काळात ‘तेवढं सोडून बोला’, ‘दाम करी काम’, ‘उनाड मैना’ या चित्रपटात चरित्र भूमिकाही केल्या. १९८१ साली त्यांनी ‘लाथ मारीन तिथे पाणी’ (१९८१) या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले आणि नंतरच्या काळात ते निवृत्त झाले.
- सुधीर नांदगावकर (विवेक)



चित्र-चरित्र