चित्र-चरित्र

राहुल रानडे
राहुल रानडे
संगीतकार
२३ मे १९६६

१९८६ सालच्या सई परांजपे लिखित-दिग्दर्शित ‘माझा खेळ मांडू दे’पासून राहुल रानडे यांचा नाटय़प्रवास सुरु झाला. राहुल रानडे यांनी आज पर्यत २०० हून अधिक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकं तसेच मराठी, हिंदी चित्रपट यांना संगीत तसेच पार्श्वसंगीत दिले आहे. काकस्पर्श, वास्तव, अस्तित्व, कोकणस्थ, सुंबरन, साने गुरुजी, डॉ.प्रकाश आमटे अशा मराठी, हिंदी चित्रपटाना त्यांनी संगीत दिले आहे.

राहुल रानडे यांनी भास्कर चंदावरकर, आनंद मोडक, अशोक पत्की यांच्यासारख्या दिग्गज संगीतकारां बरोबर काम केले आहे. मूकपटांना मानवंदना द्यावी म्हणून पुण्यातल्या राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाने तीन मूकपटांना नव्याने पाश्र्वसंगीताची जोड देऊन त्यांची एक डीव्हीडी प्रकाशित करायचे ठरवले. यात फाळकेंचे ‘राजा हरिश्चंद्र’ (१९१३) आणि ‘कालिया मर्दन’ (१९१९) हे दोन चित्रपट आणि कलिपदा दास या बंगाली दिग्दर्शकाचा ‘जमाई बाबू’ (१९३१) अशा तीन चित्रपटांचा समावेश होता. या चित्रपटांसाठी नव्याने संगीत देण्याचे काम राहुल रानडे यांनी दिले आहे.

राहुल रानडे यांची वेब साईट.
http://rahulranade.com

संजीव_वेलणकर पुणे.चित्र-चरित्र