शैलेंद्रचा जन्म मुंबईचा. तो दादर इथंच शिकला. वास्तुशास्त्रातील शिक्षण घेतल्यानंतर तो संगीत दिग्दर्शनाकडे वळला. ‘तारे जमीं पर’ चित्रपटामधील ‘मेरा जहॉं’च्या गीतासाठी शैलेंद्रनं भरपूर मेहनत घेतली होती. ‘एक सांगायचंय’, ‘पोर बाजार’, ‘एक हजाराची नोट’, ‘गजर’, ‘संहिता’, ‘गंध’ हे त्याचे उल्लेखनीय मराठी चित्रपट. ‘संहिता’ चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ‘सोना स्पा’, ‘स्ट्रायकर’ आदी हिंदी चित्रपटांनाही त्यानं संगीत दिलं आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या शीर्षक गीताला शैलेंद्रनं दिलेलं संगीत खूप गाजलं.
शैलेंद्र बर्वे ह्यांनी २०२१ मध्ये 'सब का साई' ह्या मालिकेसाठी संगीत दिले आहे.
-मंदार जोशी