चित्र-चरित्र

गौतम राजाध्यक्ष
गौतम राजाध्यक्ष
छायाचित्रकार
१६ सप्टेंबर १९५० --- १३ सप्टेंबर २०११

आपल्या कॅमेऱ्याने सिनेतारे-तारकांना ग्लॅमर मिळवून देणारे, कलाकारांना नवा चेहरा देणारे असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार म्हणजे गौतम राजाध्यक्ष. त्यांना संगीताची खूप आवड आणि जाण होती. ऑपेरा संगीत, नाट्य संगीत, शास्त्रीय संगीताचा त्यांच्याकडे मोठा संग्रह होता. १९८७ साली त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन स्वतंत्रपणे व्यवसायिक फोटोग्राफी सुरु केली. काही काळातच त्यांनी ग्लॅमर फोटोग्राफर म्हणून लौकिक मिळविला. राजाध्यक्ष यांनी ‘द इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया’, ‘स्टारडस्ट’, ‘सिनेब्लिट्झ’, ‘फिल्मफेयर’ यासारख्या प्रकाशनांसाठी फोटोग्राफी केली. अभिनेता सलमान खान, अभिनेत्री टिना मुनिम आणि प्रसिद्ध मॉडेल शितल मल्हार यासारखे कलावंत, मॉडेल हे राजाध्यक्ष यांनी काढलेल्या फोटोंमुळे प्रकाशझोतात आले होते. ते काही काळ ‘चंदेरी’ या मराठी सिनेपत्रिकेचे संपादक होते. त्यांनी ‘सखी’ या मराठी चित्रपटासह ‘बेखुदी’, ‘अंजाम’ या हिंदी चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या होत्या.

मंदार जोशी



चित्र-चरित्र