चित्र-चरित्र

महेश लिमये
महेश लिमये
सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शक
१८ जून

हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीमधील अत्यंत प्रतिभावान सिनेमॅटोग्राफर अशी महेश लिमये यांची ओळख आहे. गेल्या दशकभरात लिमये यांनी बॉलिवुडमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. तसेच मराठी चित्रपटसृष्टीतही ते कार्यरत आहे. मुंबईत वाढलेल्या लिमये यांनी सुरुवातीचा काही काळ जाहिरात क्षेत्रासाठी काम केलं. त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला. ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘कॉर्पोरेट’, ‘हीरोईन’, ‘दबंग’ हे त्यांचे हिंदीतील गाजलेले चित्रपट. ‘उत्तरायण’, ‘बालगंधर्व’, ‘फॅमिली कट्टा’, ‘नटरंग’, ‘रेगे’, ‘बालक पालक’ या मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या कॅमेऱ्याची जादू दाखवली. ‘यलो’ चित्रपटाद्वारे ते दिग्दर्शक बनले.

'मुळशी पॅटर्न', 'भिकारी', 'शेंटिमेंटल', 'फॅमिली कट्टा', 'दबंग ३' (हिंदी) हे लिमये यांनी अलीकडच्या काळात चित्रीत केलेले काही महत्त्वाचे चित्रपट आहेत. २०२३ मध्ये लिमये यांनी 'जग्गु आणि ज्युलिएट' हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

- मंदार जोशी



चित्र-चरित्र