चित्र-चरित्र

पुरुषोत्तम बेर्डे
पुरुषोत्तम बेर्डे
दिग्दर्शक
२६ एप्रिल

पुरुषोत्तम बेर्डे ह्यांनी १९७५ साली सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टमधून डी.जी. आर्ट हि पदविका घेतली. मग पुढे ८ वर्षं ते जाहिरात क्षेत्रात काम करत होते. १९७८ साली “या मंडळी सादर करु या” या नाट्य संस्थेतर्फे “अलवार डाकू” नाटकाचे लेखन, दिग्दर्शन व संगीत केले. १९८३ साली ‘चौरंग’ ह्या त्यांच्या नाट्यसंस्थेतर्फे “टूरटूर” हे नाटक त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर आणले. त्यानंतर आजपर्यंत १० नाटकांचे लेखन, २० नाटकांचे दिग्दर्शन, ६० नाटकांचे संगीत दिग्दर्शन, ५ नाटकांची निर्मिती त्यांनी केली. “जाऊबाई जोरात” हे अलिकडे त्यांचे गाजलेले नाटक होय. १९८९ पासून ते चित्रपट दिग्दर्शनात आहे व आतापर्यंत त्यांनी ९ चित्रपट प्रदर्शित केले आहेत. ‘जमलं हो जमलं’, ‘हमाल दे धमाल’, ‘निशाणी डावा अंगठा’, ‘शेम टू शेम’, ‘हाच सूनबाईचा भाऊ’, ‘एक फूल चार हाफ’ हे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत.चित्र-चरित्र