चित्र-चरित्र

सुरेंद्र तळोकर
सुरेंद्र तळोकर
निर्माते-दिग्दर्शक
६ मार्च २०१५

इजा बिजा तिजा, झपाटलेल्या बेटावर यांसारखे चित्रपट तसेच अनेक विषयांवरील माहितीपटांचे निर्माते-दिग्दर्शक सुरेंद्र कृष्णाजी तळोकर उर्फ यांची पुण्यतिथी. सुरेंद्र कृष्णाजी तळोकर हे मुळचे अकोल्याचे. चित्रपटक्षेत्रात काम करण्यासाठी टी. सुरेंद्र अकोल्याहून मुंबईला आले. पुढे ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्याकडे ते काम करू लागले. पुढे डॉ. जब्बार पटेल आणि गिरीश घाणेकर यांच्यासोबतही त्यांनी सहाय्यक म्हणून काही काळ काम केले. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामलेंसारख्या कलावंतांना घेऊन त्यांनी 'इजा बिजा तिजा' या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले. गेल्या २० वर्षांपासून ते सिनेसृष्टीत कार्यरत होते. आजवर त्यांनी १००हून अधिक माहितीपटांचेही निर्मिती-दिग्दर्शन केले आहे. राज्य सरकारसह विविध मोठ्या कंपन्यांसाठी त्यांनी अनेक लघुपटांची निर्मिती-दिग्दर्शन केले. त्यांच्या काही लघुपटांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी होण्याचाही मान मिळाला होता. सुरेंद्र कृष्णाजी तळोकर यांचे निधन ६ मार्च २०१५ रोजी झाले. आपल्या समूहाकडुन सुरेंद्र कृष्णाजी तळोकर यांना आदरांजली. संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३ संदर्भ.इंटरनेट



चित्र-चरित्र