चित्र-चरित्र

अशोक पाटोळे
अशोक पाटोळे
पटकथा-संवाद लेखक
५ जून १९४८ --- १२ मे २०१५

अशोक पाटोळे यांचे शालेय शिक्षण गिरगावातील विल्सन हायस्कूल येथे झाले. अशोक पाटोळे यांना लहानपणापासूनच लेखनाची आवड होती. कथाकार, नाटककार म्हणून १९७१ मध्ये त्यांनी ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’ ही पहिली एकांकिका लिहिली. त्यांनी लिहिलेली पहिली कथा 'नवाकाळ' या दैनिकात प्रकाशित झाली होती. पुढे 'श्री दीपलक्ष्मी', साप्ताहिक मार्मिक' आदी नियतकालिकांमधून त्यांनी लिहिलेल्या विनोदी कथा प्रकाशित झाल्या होत्या. पाटोळे ह्यांनी दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचेही लेखन केले होते. लहानपणापासूनच लिखाणाची आवड असलेले पाटोळे यांनी पहिल्यांदा १९७१ मध्ये 'आयजीच्या जीवावर बायजी उदार' या एकांकिकेचे लेखन केले होते. यानंतर त्यांनी विनोदी व ह्रदयस्पर्शी अशा दोन्ही प्रकारच्या नाटकांचे लेखन करत नाट्यक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पाटोळे यांनी लिहिलेली २० नाटके व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. 'झोपा आता गुपचूप' हे त्यांचे पहिले नाटक. 'मुंबई पोर्ट ट्र्स्ट'च्या 'एकटा जीव सदाशिव' या नाटकात त्यांनी विनोदी नायकाची भूमिका केली होती. चित्रकला, वक्तृत्व, गीतगायन व अभिनय यांचीही पाटोळ्यांना आवड होती. अनुपम खेर यांच्या ’कुछ भी हो सकता है’ या आत्मकथनात्मक नाटकाचे लेखन अशोक पाटोळे यांनी केले होते. अशोक पाटोळे यांची अनेक नाटके हिंदी-गुजरातीतही यशस्वी ठरली आहेत. ‘सातव्या मुलीची सातवी सातवी मुलगी’ हा कथासंग्रह व पाचोळ्या हा त्यांचा कविता संग्रहदेखील प्रसिद्ध झाला होता. आई रिटायर होतेय', 'हीच तर प्रेमाची गंमत आहे', 'श्यामची मम्मी', 'एक चावट संध्याकाळ' ही गाजलेली नाटकं होती. अधांतर, हद्दपार, श्रीमान श्रीमती, अध्यात न मध्यात, हसरतें यांसारख्या यशस्वी दूरदर्शन मालिकांचे लेखनही त्यांनी केले होते. 'चौकट राजा', 'झपाटलेला' यासारखे चित्रपटाचे लेखन त्यांनी केले होते, अशोक पाटोळे यांचे १२ मे २०१५ रोजी निधन झाले.

-संजीव_वेलणकर पुणेचित्र-चरित्र