चित्र-चरित्र

रामदास फुटाणे
रामदास फुटाणे
चित्रपट निर्माते
१४ एप्रिल १९४३

रामदास फुटाणे यांचा जन्म जामखेडचा. १४ एप्रिल १९४३चा. महाराष्ट्रातले एक व्यंग्यकवी आणि पटकथा लेखक, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक म्हणून ते प्रसिद्ध आहे. आहेत. कोपरखळ्या मारणार्‍या त्यांच्या छोट्याछोट्या कवितांनी महाराष्ट्रीय वाचकांचे अनेक वर्षे मनोरंजन केले आहे. रामदास फुटाणे १९६१ ते १९७३ या काळात कला विद्यालयात शिक्षक होते. कटपीस : हिंदी कवितासंग्रह (१९६९), सफेद टोपी लाल बत्ती : मराठी कवितासंग्रह (१९८६), चांगभलं : मराठी कवितासंग्रह (१९९०), भारत कधी कधी माझा देश आहे : मराठी कवितासंग्रह(१९९७), फोडणी : मराठी कवितासंग्रह (२००१), कॉकटेल : मराठी कवितासंग्रह (२००२) ही त्यांची गाजलेली ग्रंथसंपदा. मराठी चित्रपटसृष्टीत ‌‘माइलस्टोन’ म्हणून गणल्या जाणाऱ्या ‘सामना’ (१९७५) या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली होती. सर्वसाक्षी (चित्रपट) -१९७९ पटकथा, निर्मिती, दिग्दर्शन, सुर्वंता (चित्रपट) -१९९४ दिग्दर्शन हे त्यांचे इतर उल्लेखनीय चित्रपट. सामना (चित्रपट) : ३ राष्ट्रीय पुरस्कार, फिल्म फेअर अवॉर्ड्‌स आणि राज्य पुरस्कार. १९७५च्या बर्लिन येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड, आणि महोत्सवात सहभाग. सर्वसाक्षी (चित्रपट) : बेंगलोरच्या इंडियन पॅनोरमासाठी आणि हाँगकाँग येथे झालेल्या ५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड. सुर्वंता (चित्रपट) : उत्कृष्ट ग्रामीण चित्रपटाचा १९९५चा राज्य पुरस्कार; १९९५चा उत्कृष्ट चित्रपटासाठीचा कालनिर्णय पुरस्कार; उत्कृष्ट दिग्दर्शनाचा १९९५चा वसंत जोगळेकर पुरस्कार. २०१६ मध्ये फुटाणे यांनी 'सरपंच भगीरथ' हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाचे संवाददेखील त्यांनीच लिहिले आहेत.



चित्र-चरित्र