कोल्हापूर येथील एक प्रथितयश दिग्दर्शक म्हणजे सतीश रणदिवे. १९९०च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टी अडचणीत असताना श्री. रणदिवे यांनी चांगल्या प्रकारचे चित्रपट दिग्दर्शित केले. `दुस-या जगातील`, `माहेरची माया`, `गृहप्रवेश`, `रिक्षावाली`, `शुभ बोल ना-या`, `मज्जाच मज्जा`, `बहुरूपी, चल रे लक्ष्या मुंबईला` हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट. अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची कारकीर्द भरात असताना श्री. रणदिवे यांनी त्यांच्याबरोबर बरेच चित्रपट केले.