चित्र-चरित्र

प्रशांत दळवी
प्रशांत दळवी
लेखक
७ डिसेंबर

मराठी रंगभूमी तसेच मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या दोन दशकांपासून अत्यंत सकस लेखन करणाऱ्यांमधील सर्वात आघाडीचं नाव म्हणजे प्रशांत दळवी. अजित दळवी, प्रशांत दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णी या त्रिकुटानं मराठी रंगभूमी तसेच चित्रपटांवर एकत्रितपणे अमीट असा ठसा उमटवला आहे. औरंगाबाद येथे उत्तम काम केल्यानंतर दळवी कलाक्षेत्रात उतरले. ‘फॅमिली कट्टा’, ‘दुसरी गोष्ट’, ‘आजचा दिवस माझा’, ‘तुकाराम’, ‘कदाचित’, ‘बिनधास्त’, ‘भेट’ या त्यांच्या उत्तम चित्रपट कलाकृती. ‘गेट वेल सून’, ‘चारचौघी’, ‘चाहुल’, ‘ध्यानीमनी’, ‘सेलिब्रेशन’ ही त्यांची नाटकंदेखील खूप गाजली. समाजातील संवेदनशील घडामोडींवर प्रभावी भाष्य करण्यात ते आघाडीवर आहेत.

-मंदार जोशीचित्र-चरित्र