चित्र-चरित्र

नंदू होनप
नंदू होनप
संगीतकार
१ जुलै --- १७ सप्टेंबर २०१६

भक्तीसंगीताच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेले ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक अशी नंदू होनप यांची ओळख होती. कॅसेटच्या जमान्यात नंदू होनप यांच्या कर्णमधूर संगीतानं महाराष्ट्राला वेड लावलं होतं. अजित कडकडे, रवींद्र साठे, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, गुलशन कुमार अशा गायकांना घेऊन त्यांनी एकापेक्षा एक अभंग, भजनांचा सांगितिक नजराणाच संगीतरसिकांना दिला. संगीतकार म्हणून होनप यांनी सर्वाधिक भक्तीगीतांना स्वरसाज चढवला असला तरी त्यांनी संगीताचे अनेक प्रकार हाताळले. लावणी, भारुडं, स्तोत्र, मंत्र, भावगीतं, प्रेमगीतं आदींनाही त्यांनी संगीत दिले. त्यांची अनेक गीतं आजही लोकांच्या ओठावर आहेत. सुमारे नव्वद मराठी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते. ‘सारेच सज्जन’, ‘संघर्ष’, ‘हिरवा चुडा सुवासिनीचा’, ‘आई थोर तुझे उपकार’, ‘कुलस्वामिनी अंबाबाई’, ‘मी तुळस तुझ्या अंगणी’ हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट. २०१६ मध्ये भक्तीविषयक कार्यक्रम सादर करीत असतानचा रंगमंचावर त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
-मंदार जोशीचित्र-चरित्र