चित्र-चरित्र

रुपकुमार राठोड
रुपकुमार राठोड
पार्श्वगायक, संगीतकार
१० जून १९७३

रूपकुमार राठोड हे गायक विनोद राठोड व संगीतकार नदीम-श्रवणपैकी श्रवण राठोड यांचा भाऊ होय. जुन्या काळ्यातील शास्त्रीय संगीतातील जेष्ठ गायक व ध्रुपदचे उस्ताद पंडित चतुर्भुज राठोड यांची ही मुलं. रुपकुमार आणि विनोद भाऊ असले तरी त्यांच्या आवाजाच्या जातकुळीत फरक आहे. रूपकुमार यांचा आवाज हळूवार तर विनोद राठोड यांचा त्यामानाने भारी आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून संगीतविषयक अभिरूची रूपकुमार राठोड यांना होती. राठोड यांचे सांगीतिक घराणे आहे. त्यांच्या कुटुंबात संगीत परंपरा आहे. वयाच्या तिशीपर्यंत तबलावादनाचे काम करून पुढे उत्तम गायक आणि संगीतकार अशी कारकीर्द त्यांनी घडविली आहे. रूपकुमार राठोड यांनी हिंदी, मराठी, उर्दू अशा तेरा भाषांमध्ये १००० हून अधिक गाणी गायली असून त्यांचे १७ हून अधिक अल्बम प्रसिद्ध झाले आहे. संगीतकार आणि गझल गायक म्हणूनही त्यांचा लौकीक आहे. १९९७ मध्ये ‘बॉर्डर’ चित्रपटातील त्यांनी गायलेले ‘संदेसे आते है....’ हे देशभक्तीपर गाणे तरूणाईच्या ओठावर होती. तसेच ‘तेरे नाम’, ‘तेजाब’, ‘मदहोशी’, ‘जहर’, ‘नजर’, ‘धूमधडाका’, ‘लाईफ एक्सप्रेस’ आणि मराठी चित्रपट ‘गुलमोहर’लाही त्यांनी संगीत दिले आहे. रूपकुमार राठोड आणि सोनाली राठोड या दांपत्यानी देशा व विदेशात अनेक गायन मैफली केल्या आहेत. त्यांना २०१२ साली मिर्ची म्युजिक पुरस्कार मिळाला आहे. तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे सिद्धी विनायक ग्रुप पुरस्कृत आशा भोसले पुरस्कार रूपकुमार राठोड यांना मिळाला आहे.
- संजीव वेलणकर, पुणेचित्र-चरित्र