कॅमेरा अटेंडंट ते सुपरस्टार सिनेमॅटोग्राफर असा लक्ष्मण उतेकर यांचा प्रवास आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील छायांकन क्षेत्रामधील सध्याचं हे आघाडीचं नाव आहे. उतेकर यांनी आतापर्यंत ‘ब्लू’, ‘बॉस’, ‘तेवर’, ‘डिअर जिंदगी’, ‘हिंदी मिडीयम’ या चित्रपटांपासून ते अगदी अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलं आहे. हिंदीत मोठं नाव मिळवल्यानंतर उतेकर मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शनाकडे वळले. ‘टपाल’ आणि ‘लालबागची राणी’ हे त्यांनी दिग्दर्शित केलेले दोन उल्लेखनीय चित्रपट. कलात्मकता आणि व्यावसायिकता यांचा सुरेख संगम त्यांच्या कामात आढळतो.
'मिमी', 'लुकाछूपी' हे उतेकर यांचे अलीकडचे उत्तम चित्रपट.
मंदार जोशी