चित्र-चरित्र

अच्युत ठाकूर
अच्युत ठाकूर
संगीत दिग्दर्शक
७ मे १९५२ --- १८ मे २०२१

ठाकूर यांचं मूळ गाव अलिबागजवळचं कोपर. घरची पार्श्वभूमी संगीताची. वडील जि.प. शाळेत शिक्षक. पोयनाड येथील शाळेच्या स्नेहसंमेलनात ठाकूर यांनी गायलेल्या ‌‘इंद्रायणी काठी’ गाण्याला प्रथम पारितोषिक. संगीताची आवड पाहून ठाकूर यांना मुंबईत आणलं. पं. शिवरामबुवा वरळीकर यांच्याकडे त्यांनी संगीताचे धडे घेतले आहेत. बी. पी. आडसूळ, गुलाम ख्वाजा, पं. यशवंतबुवा जोशी हे त्यांचे नंतरचे गुरू. १९७५ मध्ये ते संगीत विशारद झाले. त्यानंतर मुंबई महापालिकेमध्ये संगीत शिक्षक म्हणून काम केलं. १९७६ पासून संगीतकार विश्वनाथ मोरे यांना ध्वनिमुद्रणात सहाय्य. त्यांच्याकडेच संगीत दिग्दर्शनाचं त्यांनी शिक्षण घेतलं. १९८४ मधील ‘श्रीरामायण’ हा त्यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट. ‘पैज लग्नाची’, ‘घे भरारी’, ‘बरखा सातारकर’, ‘सत्ताधीश’, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’, ‘सवाल माझ्या प्रेमाचा’, ‘तहान’ हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट.

१८ मे २०२१ रोजी अच्युत ठाकूर यांचे निधन झाले.

-मंदार जोशी



चित्र-चरित्र