चित्र-चरित्र

श्रीकांत ठाकरे
श्रीकांत ठाकरे
संगीतकार, निर्माते
२७ जून १९३० --- १० डिसेंबर २००३

श्रीकांत ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे संगीताचे जाणकार. ते सतार उत्तम वाजवीत. लहानपणी श्रीकांत ठाकरे हे बुलबुलतरंग वाजवीत असत. १९३९ मध्ये ते व्हायोलिन वाजवायला शिकले. सुरुवातीच्या काळात त्यांना सी. व्ही. पंतवैद्य हे व्हायोलिन शिकवत. १९४४ साली श्रीकांतजींनी पहिला व्हायोलिय वादनाचा जाहीर कार्यक्रम केला. मराठी नाटकाचे त्यांना विशेष आकर्षण. परंतु गझलचा ढंग आवडल्यामुळे त्यांनी उर्दू शिकण्यास प्रारंभ केला. वंदना विटणकर यांच्याकडून त्यांनी उर्दू वजनाच्या मराठी शब्दात गझल लिहून त्या महंमद रफींच्या आवाजात ध्वनिमुद्रित केल्या. श्रीकांतजींनी ‌‘शूरा मी वंदिले’, ‘सवाई हवालदार’, ‘महानदीच्या तीरावर’, ‘मालेगावच्या माताजी’ या चित्रपटांना संगीत दिले. श्रीकांतजींनी काही कॅसेट्स सुरेश वाडकर यांच्या आवाजातही प्रकाशित केल्या होत्या. १० डिसेंबर २००३ रोजी श्रीकांत ठाकरे यांचे निधन झाले.
मंदार जोशी



चित्र-चरित्र