चित्र-चरित्र

उषा नाडकर्णी
उषा नाडकर्णी
अभिनेत्री
१३ सप्टेंबर १९४६

एक बिनधास्त आणि मोकळ्या मनाची आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री म्हणून उषा नाडकर्णी यांना ओळखले जाते. चाळीस वर्षांहून अधिकचा काळ त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत, छोट्या पडद्यावर विविधांगी भूमिका वठवल्या आहेत. उषाताईंना एकूण चार बहीण भावंडं. त्यांची एक बहीण बँकेत नोकरी करते. त्यांना एक भाऊ असून ते मुंबईत वास्तव्याला आहेत. उषाताईंनी अभिनय करु नये, असे त्यांच्या आईचे आईचे म्हणणे होते. पण उषाताईंना बालपणीच कलेची आवड निर्माण झाली.चौथ्या वर्गात असताना उषाताईंनी पहिल्यांदा मंचावर नृत्य सादर केले होते.मोठे झाल्यानंतर त्यांची अभिनयातील रुची अधिक वाढू लागली.एकदा तर उषाताईंच्या आईंनी रागात त्यांचे सामान घराबाहेर फेकून दिले होते.आईने घरातून हाकलून दिल्यानंतर उषाताई मैत्रिणीकडे राहायला गेल्या होत्या.पण नंतर त्यांचे वडील त्यांना समजावून घरी परत घेऊन आले होते. ‘सिंहासन’, ‘धुमाकूळ’, ‘देऊळ’, ‘यलो’, ‘माहेरची साडी’, ‘पक पक पकाक’, ‘व्हेंटिलेटर’ हे त्यांचे लक्षणीय मराठी चित्रपट. ‘वास्तव’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’ यासारख्या हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी कामं केली. ‘पवित्र रिश्ता’ या हिंदी तसेच ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकांमधील त्यांच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं.

मंदार जोशीचित्र-चरित्र