चित्र-चरित्र

श्रिया पिळगांवकर
श्रिया पिळगांवकर
अभिनेत्री
२५ एप्रिल १९८९

अभिनेते सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांची कन्या असलेल्या श्रियाला अभिनय आणि फिल्ममेकिंगचे धडे लहानपणापासूनच मिळाले. मुंबईच्या झेवियर्स महाविद्यालयामधून मानसशास्त्रामध्ये श्रियानं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी श्रियानं `तू तू मैं मैं` या मालिकेमध्ये काम केलं होतं. `एकुलती एक` या चित्रपटाद्वारे तिनं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटामधील कामगिरीसाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला होता. फॅन हा तिचा पहिला हिंदी चित्रपट. केवळ चित्रपटांमध्ये काम करण्याखेरीज श्रिया सध्या वेब सिरीज तसेच हिंदी रंगभूमीवरही काम करीत आहे.

श्रियाने अलीकडच्या केलेल्या वैविध्यपूर्ण मालिका म्हणजे मिर्झापूर, क्रॅकडाउन, द गॉन गेम, बटरफ्लाय रोमिओ. २०२२ मध्ये श्रियाने अभिनय केलेली 'द ब्रोकन न्युज' ही वेब सेरीज यशस्वी ठरली हाती.

-मंदार जोशी



चित्र-चरित्र