सोनाली करतेय पहिल्यांदाच रहस्यमय चित्रपट…
——
‘विकी वेलिंगकर’ चित्रपटाचा प्रवास माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा होता. हंपी चित्रपटाच्या प्रीमियर शोला सौरभसर उपस्थित होते. यावेळी त्यांनी सचिन आणि अतुलला सांगितलं होतं की आपण एक वेगळी फिल्म करूया आणि त्यामध्ये सोनालीला आपण कास्ट करूया. मात्र तिनं जर का हा चित्रपट करण्यास नकार दिला, तर मग काय करायचं? असा प्रश्नदेखील त्यांनी विचारला होता. माझ्यावर दडपण आणणारा हा प्रश्न होता. तसेच माझ्याकडेही त्यांनी तू जर हा चित्रपट स्वीकारला नाहीस तर तो मग मी करणारच नाही, असंही मला सांगून टाकलं. एखाद्या कलाकारासाठी यापेक्षा अधिक चांगली गोष्ट असू शकत नाही. अशाप्रकारे मी या चित्रपटासाठी निवडले गेले. काही काळानं त्यांनी या चित्रपटाचं मला प्रेझेंटेशन केलं. ही फिल्म कशी दिसेल, त्यातल्या व्यक्तिरेखा कशा असतील, संगीत कसं असेल, साउंड कसा राहील, या सगळ्या गोष्टी त्यांनी मला स्पष्ट केल्या. मुळात रहस्यप्रधान जॉनर हा मराठी चित्रपटसृष्टी तसा नवीन आहे. तसेच काही बनले असतील तर त्यात काम करण्याची संधी मला मिळाली नव्हती. त्यामुळे रहस्यमय जगत हे माझ्यासाठी पूर्णतः नवीन होते. मग मी रितेश, अनुया, कार्तिक, अर्जुन, अतुल, सचिन… अशी आमची सगळी टीम जमली. अशी आमची ही टीम जमली.
अवघ्या २० दिवसांमध्ये आम्ही चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. हे सगळे दिवस कसे गेले ते आमचं आम्हालाच कळलं नाही. सेटवर अगदी मजेशीर वातावरण असायचं. एकंदरीत सर्व आनंदी मूडची लोकं सेटवर एकत्र आली होती. खाऊन, पिऊन मज्जा करीत आम्ही हा चित्रपट पूर्ण केला. मात्र मी एकटीच डाएटवर होते. मुळात काहीतरी वेगळं करायचं, या विचारातूनच हा चित्रपट बनला. हिरकणीनंतर माझा अशाप्रकारचा चित्रपट येतोय, हे मला एक अभिनेत्री म्हणून खूप छान वाटतंय. मिकी व्हायरस नावाचा हिंदी चित्रपट सौरभसरांनी दिग्दर्शित केला आहे. परंतु, त्यानंतर एखादा हिंदी चित्रपट करण्याऐवजी त्यांना मराठी चित्रपट दिग्दर्शित करावासा वाटला, हीच बाब खूप महत्त्वाची आहे.
“विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून ती एक घड्याळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहणाऱ्या नायिकेची ही कथा आहे. ती सर्वांना आवडेल अशी मला अपेक्षा आहे.
– सोनाली कुलकर्णी
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया