अतिथी कट्टा

दिनांक : २९-०३-२०२३

‘फुलराणी’ बनणं माझ्यासाठी सुखकारक…


‘पिग्मॅलिअन’ या गाजलेल्या नाट्यकृतीवर १९६४ साली आलेली ‘माय फेअर लेडी’ म्युझिकल फिल्म ही चांगलीच गाजली होती. याच कलाकृतीने प्रेरित होऊन विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली ‘फुलराणी…अविस्मरणीय प्रेम कहाणी’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. त्याला प्रेक्षकांनी चांगलं स्वीकारलं आहे. या चित्रपटात मुख्य व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदरलकरचं हे मनोगत.


——–

‘फिनक्राफ्ट मीडिया’ ‘अमृता फिल्म्स’ आणि ‘थर्ड एस एंटरटेन्मेंट’ने चित्रपटाची प्रस्तुती केली असून विश्वास जोशी, अमृता राव, श्वेता बापट चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. जाई जोशी, श्री.ए.राव, स्वानंद केळकर या चित्रपटाचे निर्माते आहेत. या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले आहे. गीते बालकवी, मंदार चोळकर, गुरु ठाकूर यांची असून संगीत निलेश मोहरीर आणि वरुण लिखाते यांचे आहे. छायांकन केदार गायकवाड, कलादिग्दर्शन संतोष फुटाणे, नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे. या चित्रपटाचे वितरण ‘वायकॉम १८’ स्टुडिओने केले आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचं आहे. छायांकन केदार गायकवाड तर संकलन गुरु पाटील आणि महेश किल्लेकर यांचे आहे. असोशिएट दिग्दर्शक उत्कर्ष शिंदे तर मुख्य सहाय्यक दिग्दर्शक संतोष वाडेकर आहेत. सायली सोमण यांची वेशभूषा असून रंगभूषा संतोष गायके यांची आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे. कलादिग्दर्शन संतोष फुटाणे यांचे आहे. कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी मिलिंद शिंगटे तर लाईन प्रोड्युसरची जबाबदारी आनंद गायकवाड यांनी सांभाळली आहे. ‘हिरवे हिरवे गाल गालीचे’ बालकवींची ही प्रसिद्ध कविता समस्त मराठी जनांच्या हृदयात कायमची कोरली गेली आहे. रसिकांच्या कितीतरी पिढ्या या ‘फुलराणी’ने फुलवल्या. ‘फुलराणी’ या मराठी चित्रपटातून ही अजरामर कविता गीतरूपाने आपल्या भेटीला येणार आहे. यातील ‘विक्रम राजाध्यक्ष’ ही भूमिका अभिनेता सुबोध तर कोळी आगरी ठसकेबाज ‘शेवंता’ अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिने साकारली आहे. बालकवींची कविता हृषिकेश रानडे आणि गायिका वैशाली सामंत यांच्या स्वरांनी हे गीत सजलं आहे. गायक आणि गायिकेच्या अशा दोन्ही रूपात हे गीत ऐकता येणार आहे.

या चित्रपटामधील शीर्षक भूमिका साकारणारी प्रियदर्शिनी इंदलकर म्हणते, ‘पूर्णपणे नवं असं काहीतरी करून दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. या भूमिकेच्या निमित्ताने मला ती संधी मिळाली. ‘फुलराणी’तील त्या फुलवालीनं माझ्या अभिनय विश्वातल्या येण्याचं वर्तुळ पूर्ण केलं. भाषेचा लहजा, हेलकावे, लकबी टिपत ही ‘फुलराणी’ मी साकारली आहे. ‘प्रियदर्शिनी ते शेवंता’ बनण्याचा आपला प्रवास अत्यंत आश्चर्यकारक प्रवास अनपेक्षितपणे पूर्ण झाला. खरं तर ‘फुलराणी’सारखा इतका मोठा सिनेमा आणि त्यात टायटल रोल साकारण्याची संधी मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. ‘फुलराणी’साठी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या गाजलेल्या दृश्याचं ऑडीशन द्यायला मला जेव्हा सांगितलं गेलं, तेव्हा माझं सिलेक्शन होईल असं वाटलंच नव्हतं. एक तर माझं याबाबत पाठांतर नव्हतं आणि बर्‍याच अभिनेत्रींना हे तोंडपाठ आहे. त्यामुळे पाठ करून सादर करणं हा माझ्यासाठी मोठा टास्क होता. आपण काही ‘फुलराणी’साठी सिलेक्ट होणार नसल्याचं मानून आपल्याला जसं वाटतंय तसं करूया असा विचार केला. आश्चर्य म्हणजे दुसर्‍याच दिवशी कॉल आला आणि मला ऑफिसमध्ये भेटायला बोलावलं गेलं. तेव्हाही वाटलं की भेटून घेऊ, पण फिल्म मिळेल असं वाटलं नव्हतं. भेटल्यावर पहिल्याच मिटिंगनंतर विश्वास सरांनी मला लॉक केलं होतं हे मला नंतर समजलं. त्यामुळे मीच ‘फुलराणी’ बनलेय हे मला स्वप्नवत असल्यासारखं वाटत होतं. खरंच आपली ’फुलराणी’ म्हणून निवड झाली असून आपण सुबोध भावेसारख्या मोठ्या नटासोबत काम करणार आहोत यावर शूट सुरू होईपर्यंत माझा विश्वासच बसत नव्हता. ‘फुलराणी’ बनणं माझ्यासाठी सुखकारक आणि अनपेक्षित होतं.”

– प्रियदर्शिनी इंदरलकर

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  नरेंद्र चौधरी


  आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया