मला ऑस्कर पुरस्कार मिळाल्यासारखं वाटतंय…
——–
आनंद दिघेसाहेबांच्या वेशभूषेत मला पाहिल्यानंतर त्यांच्या बहीण अरुणाताईंच्या डोळ्यात पाणी आलं. ते पाहून मला ऑस्कर मिळालंय, राष्ट्रीय पुरस्कारासह सगळे मोठे पुरस्कार मिळाल्यासारखं वाटतंय. तसेच नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदेदेखील दिघेसाहेबांच्या व्यक्तिरेखेतील मला पाहून भावूक झाले होते. दिघेसाहेबांच्या सर्वात जवळची ही दोन माणसं जर या पद्धतीनं व्यक्त होत असतील तर एका कलाकाराला अजून दुसरी मोठी पावती अजून काय हवी असते… मी आतापर्यंत 90 चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. परंतु, चित्रपटाची शीर्षक भूमिका माझ्या वाट्याला काही आली नव्हती. जिवंतपणी दिघेसाहेब ही व्यक्ती आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकावरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करीत होती. मलाही कुठंतरी वाटत होतं की एक अभिनेता म्हणून माझ्यावर अन्याय होतोय. मी खूप मनापासून प्रयत्न करीत होतो. मी वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका साकारीत होतो. त्यांचं प्रेक्षकांकडून कौतुकही झालं. पण मोठं काम हाताला काही लागत नव्हतं. हा माझ्यावर अन्याय होतोय असं मला वाटत होतं.
पण दिघेसाहेबांनी आपण स्वतः गेल्यानंतरही या चित्रपटाद्वारे माझ्यावरचा अन्याय दूर केला. आनंद दिघे पडद्यावर साकारणं हे अवघड काम होतं. दिघेसाहेबांसारखा मी दिसतोय याचं श्रेय आहे रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांचा. त्यानंतर प्रवीण तरडेंच्या संवादांमुळे दिघेसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वात शिरता आलं. अप्रतिम संवाद आणि स्क्रीन प्ले या चित्रपटाचा आहे. दिघेसाहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे ते ‘किंगमेकर’ होते. त्यांना भाषण करायला आवडायचं नाही. त्यामुळे त्यांची भाषणं जवळपास उपलब्धच नाहीत. त्यामुळे त्यांची जी काही हजारांहून अधिक छायाचित्रं आम्हाला मिळाली ती मी तासन्तास पाहिली. त्यांचं चालणं, बोलणं, वागणं पाहिलं. त्यातून मग त्यांची स्टाइल मी अनुसरली. तसेच दिघेसाहेबांच्या जवळच्या माणसांनी त्यांच्या काही लकबी सांगितल्या. त्यातून मग ही व्यक्तिरेखा डिझाइन केली.
– प्रसाद ओक
काही निवडक प्रतिक्रिया:
सचिन पारेकर
शाहू मोडक हे मराठी चित्रपटातील असामान्य कलाकार होते. 'माणूस' मधील त्यांची भूमिका अविस्मरणीय होती.विनम्र अभिवादन!💐💐
संजय रत्नपारखी
संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया