पाण्यासाठी लढणाऱ्यांना आमचा राष्ट्रीय पुरस्कार अर्पित
——
माझं दिग्दर्शकीय पदार्पण असलेल्या ‘पाणी’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा मला प्रचंड आनंद झाला आहे. खरं तर हा आनंद कसा व्यक्त करावा यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. आपल्या देशामधील हा सर्वात मानाचा पुरस्कार मानला जातो. गेली पाच वर्षं मी आणि माझी टीम या चित्रपटावर काम करीत होती. त्यामुळे या राष्ट्रीय पुरस्कारामुळे आमच्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटतंय. माझ्यासारख्या नवोदित दिग्दर्शकावर एवढा मोठा विश्वास टाकल्याबद्दल मी निर्मात्यांचा खूप खूप आभारी आहे. आमची क्रिएटिव्ह रश्मी कुलकर्णी हिचेही मी खूप आभार मानतो. थॅंक यू रश्मी…
हा पुरस्कार आम्ही अशा व्यक्तींना अर्पित करतो की ज्यांच्यावर हा चित्रपट आधारलेला आहे. हनुमंत हा तो माणूस. अत्यंत छोट्या गावात राहणारा. २००१ साली या गावातील सर्व माणसं एकत्र येऊन पाण्यासाठी लढली. हनुमंतनी कसं या सगळ्या लोकांना प्रोत्साहित करून गावात पाणी आणलं याची कहाणी म्हणजे हा चित्रपट आहे. हे गाव आता टॅंकरमुक्त आहे. एवढंच नव्हे तर हे गाव आता आजूबाजूच्या तीन-चार गावांना स्वतःची गरज भागवून पाणीही पुरवतं. अशी ही प्रेरणादायी गोष्ट मला जगापुढं आणावी असं वाटलं. पाण्यासाठी लढणाऱ्या माणसांना हा पुरस्कार अर्पित.
– आदिनाथ कोठारे.
काही निवडक प्रतिक्रिया:
निशांत भोसले
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
पण जर त्या सोबतच आपण एक youtube channel चालू करून त्यावर तो चित्रपट टाकावा आणि त्याची लिंक तुम्ही पुरवत असलेल्या चित्रपटाच्या माहिती खाली टाकावी जेणे करून ते उपयुक्त होईल.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया