दिवाळीत जगभरात सजणार ‘हर हर महादेव’चे तोरण
‘‘हर हर महादेव’मध्ये बाजीप्रभू देशपांडे यांची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता शरद केळकर म्हणाला, “यापूर्वीच्या ‘तानाजी’ चित्रपटामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटात आता मी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा बनून प्रेक्षकांच्या भेटीस आलो आहे. मी मूळचा ग्वाल्हेरचा. पण हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या लक्षात येईल की हा महाराष्ट्राचाच मुलगा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी जेव्हा मला ही भूमिका ऑफर केली तेव्हा, मलादेखील सुरुवातीला आश्चर्य वाटलं होतं. ज्या कलाकाराला प्रेक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहिलंय, त्या कलाकाराला बाजीप्रभूंचं रूप कसं देतील, याची महाही उत्सुकता होती. त्यामुळे दिग्दर्शकानं माझ्यावर जो काही विश्वास टाकला त्यावर 100 टक्के खरं उतरण्याचा प्रयत्न मी केला आहे.
‘हर हर महादेव’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता सुबोध भावे यानं साकारली आहे. त्याबद्दल तो म्हणाला, “मी जेव्हा या क्षेत्रात कारकीर्द घडविण्यासाठी मुंबईत आलो, तेव्हा प्रसिद्ध दिग्दर्शक विनय आपटे हे छत्रपती शिवाजी महाराजांवर एका मालिकेची निर्मिती करीत होते. हिंदी भाषेमधील या मालिकेसाठी मी शिवछत्रपतींच्या भूमिकेसाठी ‘ऑडिशन’ दिली होती. परंतु तेव्हा या भूमिकेसाठी माझी निवड काही झाली नव्हती. या भूमिकेपर्यंत पोहोचायला मला तब्बल 22 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. कदाचित मी माणूस म्हणून प्रगल्भ होण्याची वाट स्वतः छत्रपती शिवाजी महाराज पाहात असतील. या चित्रपटाचा दिग्दर्शक अभिजित देशपांडेबरोबर माझा हा दुसरा चित्रपट आहे. शिवछत्रपतींवर बनणारा कोणताही चित्रपट हा मला एक सुंदर योग वाटतो. महाराजांना 50 वर्षं आयुष्य मिळालं. त्या काळात त्यांनी अनेक माणसं जोडली. शिवछत्रपतींनी आपल्या सहकार्यांच्या समवेत स्वराज्य साकारण्याचं स्वप्न पाहिलं नि ते सत्यात उतरवलं. या सगळ्या प्रवासात त्यांना अगणित सहकाऱ्यांनी साथ दिली.”
– टीम ‘हर हर महादेव’
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया