अतिथी कट्टा

दिनांक : १६-०६-२०२२

पश्चिम घाटावरचा धमाल चित्रपट म्हणजे ‘भिरकीट’


ग्रामीण पार्श्वभूमी लाभलेला भिरकीट हा चित्रपट येत्या १७ जूनला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अभिनेता हृषीकेश जोशी यानं एक महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्तानं त्याचं हे मनोगत.

——–

‘भिरकीट’ ही ग्रामीण पार्श्वभूमीची गोष्ट आहे. गावातल्या जाबरअण्णा या व्यक्तिमत्त्वाच्या जावयांची भूमिका मी या चित्रपटात साकारली आहे. मुंबईत राहणारं हे व्यक्तिमत्त्व बेशरम, निर्लज्ज, बेमुर्वतखोर पद्धतीचं आहे. या जाबरअण्णांच्या निधनानंतर तो गावात येतो. परंतु त्याला त्या गंभीर प्रसंगाबद्दल फारसं काहीच वाटत नसतं. सासर्‍याचा मरणाचा तो ‘प्रॅक्टिकली’ विचार करतो. म्हटलं तर तो कशातही नाही आणि म्हटलं तर तो सगळ्यातही आहे. मला सर्व पद्धतीच्या भूमिका आवडतात. त्यातलीच ही भूमिका आहे. अनुप जगदाळेला वाटलं की ही भूमिका साकारलायच हवी. म्हणून मी ती स्वीकारली.

पश्चिम घाटावरचा हा ग्रामीण बाजाचा धमाल चित्रपट आहे. तशी तिथली भाषा मग माझ्या व्यक्तिरेखेत मी आणलीय. तो इरसालपणा त्यात मी आणलाय. अनुपनं आम्हाला या चित्रपटात अगदी बेछूट सोडून दिलंय. त्यामुळे शूटिंगचा अनुभव भारी होता. गिरीशबरोबर यापूर्वी मी ‘देऊळ’ आणि ‘मसाला’ हे दोन चित्रपट केलं होतं. त्यामुळे तो एक नट म्हणून मला चांगलाच ठाऊक होता. कुशल बद्रिके, सागर कारंडे यांचंही काम मी बघत आलो आहे. क्रिकेटच्या पीचवर समोरचा बॅट्समन कसा आहे त्यावर पार्टनरशीप खुलते. तसं काहीतरी या चित्रपटात झालंय. ‘स्क्रीप्ट’मध्ये राहून आम्ही काही ‘इम्प्रोव्हायझेशन’ही केलंय. तशी संधी इतर सिनेमात मिळत नाही. नाटकात तशी संधी असते. सिनेमात तेवढा वेळ नसतो. पण ही संधी दिग्दर्शक अनुपनं आम्हाला दिली हे खूप महत्त्वाचं आहे.

– हृषिकेश जोशी

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  नरेंद्र चौधरी


  आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया