शेमारू वाहिनीमुळे प्रेक्षकांना दर्जेदार चित्रपट पाहता येणार
——
हिरेन गडा – शेमारु मराठीबाणा’मुळे आता मराठी भाषिक रसिकांमध्ये ‘शेमारू एन्टरटेनमेंट’चा पाया अधिक व्यापक होणार आहे, कारण आम्ही अतिशय दर्जेदार कंटेंट आमच्या या अभिजात मराठी चित्रपट वाहिनीच्या माध्यमातून ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहोत. प्रेक्षक व जाहिरातदार यांच्या दृष्टीने बोलायचं तर माध्यम व करमणूक विश्वात आम्ही या आधीच आमचे भक्कम स्थान प्रस्थापित केलेले आहे. तोच वारसा पुढे नेत आम्ही या, ‘शेमारु मराठीबाणा’च्या माध्यमातून प्रचंड मोठ्या संख्येने असलेल्या मराठी भाषिक रसिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांना त्यांच्याच भाषेत दर्जेदार करमणूक उपलब्ध करून देऊन आम्ही त्यांचे मनोरंजन करू शकू याचा आम्हाला विश्वास वाटतो. साधारण सहा दशकांपूर्वी ही कंपनी स्थापन झाली. सुरुवातीच्या काळात मराठी चित्रपटांच्या निर्मितीची संख्या मोठी नव्हती. ती आता वाढल्यामुळे चांगला आशय आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोचवणे शक्य आहे.
मराठी रसिकांचे मनोरंजन हाच मुख्य उद्देश ठेवून सुरु करण्यात आलेल्या या चॅनलवर महाराष्ट्र व गोव्यातील प्रेक्षकांना उत्तमोत्तम मराठी चित्रपट व नाटकं बघता येणार आहेत. त्याचे नाव ‘मराठी बाणा’ हे सुद्धा मराठी अस्मितेशी निगडीत असून मराठी संस्कृतीचा प्रचार-प्रसार करण्यात, ती लोकप्रिय करण्यात ते महत्वाची भूमिका बजावेल यात शंका नाही. ‘चित्रपटांच्या दुनियेतली चॅनलची गर्दी कितीही असली तरी आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा रसिकांना देणार असून त्यांची उच्च अभिरुची लक्षात घेऊन तिचे समाधान करेल असा मनोरंजनाचा खजिना सादर करून आम्ही आमचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू. अगदी अलीकडच्या, अभिजित खांडकेकर अभिनीत ‘भय’ या चित्रपटापासून ते जुन्या जमान्यातले लोकप्रिय नायक रमेश देव यांच्या १९६२ साली प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम आंधळे असते’ या चित्रपटापर्यंत अनेक दर्जेदार चित्रपट या चॅनलवर रसिकांसाठी उपलब्ध असतील. त्यात ‘आपला माणूस’, ‘पोश्टर गर्ल्स’, ‘मितवा’, ‘क्लासमेट’ सारख्या अनेक दर्जेदार चित्रपटांचा समावेश असेल. या व्यतिरिक्त अनेक मराठी दर्जेदार नाटकांचे प्रसारण हे या टीव्ही वाहिनीचं वेगळेपण असणार आहे.
‘शेमारु’ला मराठी प्रेक्षकांची आवड बरोबर माहीत असून मराठी चित्रपट विश्वाचा तो एक मोठा घटक आहे. मराठी चित्रपट व नाटकांचा फार मोठा संग्रह ‘शेमारु’कडे आहे. गेली काही दशकं ‘शेमारु’ प्रादेशिक मनोरंजनाची निर्मिती व समन्वय या क्षेत्रातही सक्रिय आहे. अनेक आघाडीच्या चॅनेल्सवर शेमारुच्या कार्यक्रमाचं प्रसारणही होत असतं. त्यामुळेच आता ‘शेमारुच्या’च बॅनरखाली अतिशय उच्च दर्जाच्या कार्यक्रमांचं प्रसारण ही ‘शेमारु’साठी अर्थातच अतिशय नैसर्गिक अशी पुढची पायरी आहे.
महेश कोठारे (ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते) – शेमारुच्या स्थापनेपासून मी शेमारुशी संबंधित आहे आणि ही एकच कंपनी अशी आहे की जिथे तुम्हाला कोणत्याही बॅनरचा कोणताही चित्रपट हमखास मिळू शकतो. माझ्या या सृजनशील प्रवासात मी ‘शेमारु’बरोबरच वाढलो आहे.त्यामुळेच ‘शेमारू मराठी बाणा’च्या लॉंचबाबत मी प्रचंड उत्साही आहे.सर्व मराठी चित्रपट व मराठी चित्र निर्मात्यांसाठी हे एक नवीन माध्यम असणार आहे. ‘शेमारु’ने करमणूक विश्वात एक मोठे स्थान मिळवले आहे आणि त्यांचा तोच गौरवशाली वारसा ते या ‘शेमारू मराठीबाणा’च्या रूपाने ही चालू ठेवतील असा मला विश्वास वाटतो. या माध्यमातून दर्जेदार मराठी चित्रपट व नाटकांचा आस्वाद मराठी प्रेक्षकांना घेता येणार आहे.
श्रेयस तळपदे – ‘शेमारू हे या इंडस्ट्रीतल्या पायाभूत घटकांपैकी एक असून त्यांच्याकडे कंटेंटचा फार मोठा खजिना उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःचं चॅनल लॉंच करणं हे अत्यंत आवश्यकच होतं. ते हे करतायत याचा मला आनंद आहे, कारण आम्ही चित्रपट निर्माते आमची निर्मिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा माध्यमांच्या शोधातच असतो. गेल्या काही दशकांत कंटेंटच्या संदर्भात ‘शेमारु’ हे प्रथम क्रमांकावर पोहोचले आहेत. ते कायमच आघाडीवर राहिले असून अत्यंत उत्तम पद्धतीने आमचे काम लोकांपर्यंत पोहोचवत आले आहेत. आज ते नव्याने लॉंच करत असलेलं ‘शेमारू मराठीबाणा’ ही वाहिनीद्धा अल्पावधीतच प्रथम क्रमांकाचं चॅनलबनेल याची मला खात्री आहे. त्यासाठी माझ्या त्यांना हार्दिक शुभेच्छा. ते माझेही काही चित्रपट त्यावर दाखवतील आणि भविष्यातही आम्ही एकत्र काम करू अशी मी आशा करतो.
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया