अतिथी कट्टा

दिनांक : १८-११-२०२१

सिनेमाचे भारतात आगमन आणि विस्तार


ज्येष्ठ लेखक सुधीर नांदगावकर यांनी या लेखात जगातील चित्रपट माध्यमाचा जन्म, त्यानंतरच्या रोचक घडामोडी, भारतामधील चित्रपट माध्यमाचा जन्म आणि त्याची भारतात झालेली भरभराट यावर प्रकाशझोत टाकला आहे.

ल्यूमियरच्या हालत्या चित्रांचा पहिला प्रोग्राम नॉव्हेल्टीमध्ये (म्हणजे आजचे एक्सेलसियर थिएटर) चांगला लोकप्रिय झाला. तो १४ जुलै ९६ ते १५ ऑगस्ट ९६ असा एक महिना हाऊसफुल्ल चालला. असंख्य मुंबईकरांनी या हालत्या चित्रांना दाद दिली. हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर ऊर्फ सावेदादा (१८६५-१९५८) हे गृहस्थ स्वत: फोटोग्राफर होते. त्यांचे फोटोग्राफिक मटेरियलचे दुकानही मुंबईत सॅण्डहर्स्ट ब्रिजला होते. ल्यूमियरच्या हालत्या चित्रांनी त्यांना प्रभावित केले. त्यांनी एक प्रोजेक्टर खरेदी केला, चार/पाच विदेशी मूकपट खरेदी केले आणि धनिकांच्या घरी ही हालती चित्रे दाखवायला सुरुवात केली. त्यात ‘कॅन कॅन डान्स’ (१८९७) हा मूकपटही होता. त्या काळात सिनेमागृहे नव्हती. टॉऊन हॉल, इन्स्टिट्यूटचे हॉल, नाटकाचे थिएटर किंवा तंबू येथे मूकपट दाखवले जायचे. सिनेमाला स्वत:चे घर नव्हते. श्रीमंत लोकांना अशा ठिकाणी जाऊन, गर्दीत मिसळून सिनेमा पाहणे पसंत नव्हते. त्यामुळे सावेदादा घरी येऊन ही हालती चित्रे दाखवतात हे पाहिल्यावर सावेदादांच्या खेळांना चांगलीच मागणी आली.

सावेदादांना या खेळात बर्‍यापैकी पैसा मिळाला. त्यातून त्यांनी १८९८ साली लंडनहून ‘रिले ब्रदर्स’कडून कॅमेरा आयात केला. कुस्तीची फिल्म चित्रित केली, रँग्लर र. पु. परांजपे यांचा सत्कार चित्रित केला व आणखीही दृश्ये चित्रित केली. १९०१ मध्ये ल्यूमियरचा कॅमेरा त्यांनी खरेदी केला. त्यांना कथेवर आधारित मूकपट कायचा होता. पण ते धाकट्या भावाच्या आकस्मिक निधनाने खचले आणि त्यांनी ल्यूमियर कॅमेरा सातशे रुपयांना विकून टाकला. मुंबईत सावेदादा जेव्हा दहा/पंधरा मिनिटांचे मूकपट चित्रित करत होते तेव्हा कोलकत्यात हिरालाल सेन नाटकातील, ‘जात्रा’तील दृश्ये कॅमेर्‍यात टिपत होते. महाराष्ट्र व बंगाल वगळता अन्य प्रांतात १९१५ पर्यंत सिनेमाची निर्मिती होत नव्हती.

पाटणकर-करंदीकर-दिवेकर यांनी पाटणकर युनियन ही कंपनी मुंबईत स्थापन करून ‘सावित्री’ मूकपट हाती घेतला. त्यासाठी सावेदादांचा कॅमेरा विकत घेतला. अहमदाबादची नर्मदा मांडे ही सावित्रीची भूमिका करत होती, पण तांत्रिक बिघाडामुळे चित्रित केलेली फिल्म कोरीच निघाली! आणि अशा प्रकारे भारतीय पडद्यावर आलेली पहिली स्त्री हा नर्मदा मांडे यांचा सन्मान हुकला! नंतर मात्र ती कधीच मूकपटात दिसली नाही. ‘सावित्री’ १९१२ सालची निर्मिती. त्याच वर्षी दादासाहेब तोरणे यांनी श्रीपाद संगीत नाटक मंडळीचे ‘पुंडलिक’ नाटक चित्रित केले. बोर्न अ‍ॅण्ड शेपर्ड कंपनीच्या मुंबई कार्यालयातील जॉन्सन याने त्याचे छायालेखन केले होते. ‘पुंडलिक’ लॅब प्रोसेसिंगसाठी लंडनला पाठवण्यात आला. फायनल प्रिंट परत यायला सहा महिने लागले. ‘पुंडलिक’१८ मे १९१२ला मुंबईच्या कॉरोनेशन सिनेमात प्रकाशित झाला. ‘पुंडलिक’ दादासाहेब तोरण्यांनी (१८८०-१९६०) दिग्दर्शित केला होता. दादासाहेब तोरणेनी चित्रपट या नव्या माध्यमाची पायाभरणी अनेक अंगांनी केली. त्यांची कॅमेरा आयात करण्याची एजन्सी होती. नंतर तोरणेंनी ध्वनिमुद्रणाची एजन्सीही घेतली होती. त्यांनी स्वत:च सरस्वती सिनेटोन हा स्टुडियो पुण्याला कातेथे बोलपट निर्मिती केली. देशात पहिला रौप्यमहोत्सवी ठरलेला ‘श्यामसुंदर’तोरणे यांची निर्मिती होती. तोरणे ध्वनिमुद्रण यंत्रे, वितरण अशा विविध अंगांनी चित्रपटांत क्रियाशील होते.

महाराष्ट्रात चित्रपट या नव्या माध्यमाचे बीज रोवण्यासाठी तिसरे दादा पुआले, ते म्हणजे दादासाहेब फाळके (१८७० ते १९४४). फाळके मुंबईत जे. जे. स्कूल ऑफ आर्ट व बडोद्याच्या ‘कलाभवन’ मधे पेंटिंग शिकले होते. त्यांनी जादूची कलाही आत्मसात केली होती. जर्मनीत जाऊन त्यांनी लिथोग्राफी प्रिटिंग शिकून घेतले आणि भागीदारीत मुंबईला लक्ष्मी प्रिंटिंग प्रेस सुरू केला. मुंबईत चलत्-चित्रांचे जे खेळ सुरू होते, ते फाळके पाहातच होते. पेंटर म्हणून नव्या माध्यमात त्यांना रस होता. विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात युरोप व अमेरिकेतले मूकपट मुंबईत दाखवले जायचे. भागीदारांशी बिनसल्याने त्यांनी लक्ष्मी प्रिटिंग प्रेस १९१० साली सोडला. त्याच दरम्यान, त्यांनी मुंबईच्या चौपाटीजवळच्या अमेरिकन पिक्चर पॅलेसमधे ‘लाइफ ऑफ ख्राइस्ट’ हा प्रâेंच मूकपट पाहिला आणि चित्रगृहातून बाहेर पडताना कृष्णाच्या जीवनावर आपण मूकपट काअसे सिनेमाचे बीज त्यांच्या मनात अंकुरले. फाळके यांनी आपल्या एका लेखात लिहिल्याप्रमाणे प्रिंटिंग प्रेसची भागीदारी सोडल्यावर, त्यांना नवे क्षितिज पादाक्रांत करायचे होते. ‘एक पाऊल पु’ जायचे हा त्यांचा निश्चय होता आणि त्या दृष्टीने सिनेमा या नव्या माध्यमाकडे ते आकर्षित झाले. त्यांनी तसे प्रयत्न करायला सुरुवात केली. लंडनला जाऊन कॅमेरा, परफोरेटर व प्रिंटर खरेदी केले. चित्रपट निर्मितीची जुजबी माहिती गोळा केली आणि मायदेशी येऊन ‘राजा हरिश्चंद्र’१ मूकपटाची जुळवाजुळव करण्यासाठी भांडवल मिळवायच्या उद्योगाला लागले. अडचणी खूप होत्या. नटमंडळी मिळणे, भांडवल मिळणे इत्यादी. अनेक खटपटी करून सार्‍या अडचणींवर मात करून, त्यांनी मुंबईतील दादर मेनरोडवर मथुराभवन येथे शूटिंग सुरू केले. (या रस्त्याला दादासाहेब फाळके रोड असे नाव देण्यात आले आहे. आणि या रस्त्याच्या एका टोकाला १९७० साली फाळक्यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांचा पुतळाही बसवण्यात आला आहे.) फाळके एका अडचणीवर मात्र मात करू शकले नाहीत. ती म्हणजे तारामतीच्या भूमिकेसाठी त्यांना स्त्री कलाकार मिळाली नाही. म्हणून साळुंकेला त्यांनी तारामतीची भूमिका दिली.

फाळक्यांचा ‘राजा हरिश्चंद्र’ त्या काळाच्या रिवाजाप्रमाणे ३७०० फूट लांबीचा होता. तो ३ मे १९१३ रोजी मुंबईत कॉरोनेशन थिएटरमधे प्रकाशित झाला. या मूकपटाचे लेखक, दिग्दर्शक, निर्माता, संकलक इत्यादी सर्व काही एकटे फाळके होते. तोपर्यंत मूकपट निर्मिती कशी होते याची भारतात कोणालाच कल्पना नव्हती. सिनेमा भारतीय कधीच नव्हता. त्यामुळे अनेक घोटाळे व्हायचे. प्रॉडक्शनमधे काम करणारे लोक किंवा नट मंडळी फाळक्यांना ‘आम्ही कोठे काम करतो असे घरच्यांना सांगायचे?’ असे विचारत.
फाळके उत्तरले, ‘हरिश्चंद्राच्या फॅक्टरीत काम करतो’ म्हणून सांगा!
त्या काळी सिनेमाला ‘नाटक’ (झ्प्दूदज्त्aब्) आणि सिनेमा स्टुडिओला ‘कारखाना’ म्हणत असत. सावेदादा, दादासाहेब तोरणे आणि दादासाहेब फाळके या त्रिकुटाने मुंबईत चित्रपट व्यवसायाचा पाया घातला. स्वाभाविकच, मुंबई म्हणजे चित्रपट हे समीकरण तयार झाले. मराठी-गुजराती-हिंदी चित्रपट मुंबईत निघायचे. देशात कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, कोल्हापूर, बंगलोर, त्रिवेंद्रम इत्यादी अनेक ठिकाणी नंतर स्टुडियो उभे राहिले आहेत. तेथे चित्रपट निर्मितीही होते. तरीही चित्रपट व्यवसायात मुंबईचा प्रथम क्रमांक अबाधित आहे. फिल्म सेन्सॉर बोर्ड, नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कार्पोरेशन, फिल्मस् डिव्हिजन या शासकीय यंत्रणा मुंबईत सुरू झाल्या. ही कार्यालये मुंबईतच आहेत. केंद्र सरकारने भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १९५२ साली मुंबईतच भरवला. सिनेमातील अन्य नवे नवे शोध हिंदी सिनेमात म्हणजे मुंबईत प्रथम येतात. पहिली कलर लॅब १९६१ साली मुंबईत सुरू झाली आणि पहिले मल्टिफ्लेक्स ‘आयमॅक्स’ २००२ साली मुंबईत अवतरले. चित्रपट व्यवसायात मुंबईचे स्थान गेल्या शंभर वर्षांत अराहिले आहे आणि ते तसेच राहणार आहे.

पहिल्या महायुद्धानंतर, मूकपटांचा प्रेक्षक मोठ्या प्रमाणात वालागला. त्यामुळे हा व्यवसाय धनिकांच्या ताब्यात गेला. फाळके यांच्या हिंदुस्थान फिल्म कंपनीची मालकी धनिकांकडे गेली. फाळके यांनी कोहिनूर मिलचे आपटे व गुजराती मायाशंकर भट्ट यांच्या बरोबर भागीदारीत नाशिक येथे हिंदुस्थान फिल्म कंपनीचा स्टुडिओ उभारला. १९२० नंतर मुंबईत चित्रपट व्यवसायाचे व्यापारीकरण वेगाने होऊ लागले.

व्यापारीकरणापासून अलिप्त राहून, स्वत: कॅमेरा बनवून बाबुराव पेंटरांनी कोल्हापुरात ‘महाराष्ट्र फिल्म कं.’ स्थापन केली. तानीबाई कागलकर या गायिकेने त्याना पंधरा हजार रुपयांचे भांडवल दिले आणि ‘सैरंध्री’ हा बाबुराव पेंटरांचा पहिला मूकपट प्रकाशित झाला. बाबुराव स्वत: पेंटर होते, शिल्पकार होते, विश्वकर्मा होते. त्यांना यंत्रांबद्दल कुतूहल होते. कॅमेरा, घड्याळ असे कोणतेही यंत्र त्यांच्या हाती पडले, की ते पूर्णत: खोलून पुन्हा होते तसे जुळवण्यात वाकबगार होते. एक थोर चित्रकार आणि यंत्रविशारद म्हणून त्यांना तंत्राधिष्ठित ‘सिनेमा’ माध्यमाचे आकर्षण असल्यास नवल नाही.

बाबुरावांनी आपल्या नऊ वर्षांच्या काळात ‘सैरंध्री’ या पौराणिक चित्रपटानंतर ‘सिंहगड’ हा ऐतिहासिक व ‘सावकारी पाश’ हा सामाजिक बोलपट निर्माण केले. तसेच अन्य पौराणिक व ऐतिहासिक चित्रपटही निर्मिले. बाबुरावांना सिनेमा ही दृश्यकला आहे. वास्तवाचे प्रतिबिंब त्यात उमटले पाहिजे याची जाण फाळक्यांपेक्षाही अधिक होती. त्यांनी पहिल्या मूकपटापासून स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनाच दिल्या. फाळक्यांची तारामती किंवा सीता नऊवारीत दिसतात. वास्तविक, या दोन्ही पौराणिक व्यक्तिरेखा व त्यांच्या कथा उत्तर भारतातल्या आहेत आणि नऊवारी साडी फक्त महाराष्ट्रात नेसली जाते. अशा चुका बाबुरावांच्या चित्रपटात नाहीत. सिनेमाला ‘कले’चा स्पर्श भारतात बाबुरावांच्यामुळे झाला. लोकमान्य टिळकांनी ‘सैरंध्री’ पाहिला आणि बाबुरावांना कला आणि व्यवसाय यांचा योग्य मिलाप करणारे सिनेमा केसरी ही पदवी आणि सुवर्णपदक दिले. फाळके आणि पेंटर यांना सिनेमा हा ‘व्यवसाय’ही आहे याचे मात्र भान नव्हते. म्हणून या थोर कलावंतांना अखेरचे दिवस विपन्नावस्थेत आणि चित्रपटाबाहेर फेकले जाऊन कालागले. सिनेमा ही यंत्राधिष्ठित ‘कला’ आहे आणि त्याचा कर्ता करविता दिग्दर्शक; चित्रपट तयार होईपर्यंत कलानंदात बेहोष राहू शकतो. पण एकदा का चित्रपट तयार होऊन प्रेक्षकांसमोर आला की तो ‘व्यवसाय’ बनतो. याची जाणीव त्यांना अजिबात झाली नाही. ते शहाणपण बाबूराव पेंटरांचे शिष्य व्ही. शांताराम यांना होते. शांतारामबापू १९ वर्षांचे असतांना १९२० साली कोल्हापूरात पेंटरांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत हरकाम्या म्हणून उमेदवारी करू लागले. शांतारामबापूंनी पेंटरांच्या अन्य शिष्यांना म्हणजे दामले, फत्तेलाल, धायबर यांना बरोबर घेऊन १९२९ साली कोल्हापुरात प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली. चित्रपटात जे नवे तंत्र, नवे शोध येत ते सर्व शांतारामबापूंच्या मुळे ‘प्रभात’मधे उपयोगात आणले जायचे. या उत्साहातूनच १९३३ साली शांतारामबापूंनी कोल्हापुरात ‘सैरंध्री’या रंगीत बोलपटाचा प्रयोग केला किंवा जर्मनीतून टेलिफोटो लेन्स आणून सैरंध्री नंतरच्या पुच्या ‘अमृतमंथन’ चित्रपटात राजगुरूंच्या डोळ्यांचा ‘क्लोजअप’ पडदाभर दाखवला. शांतारामबापूंनी महाराष्ट्र फिल्म कंपनीत उमेदवारी केली तेव्हा संकलन, प्रोसेसिंग, कॅमेरा या सार्‍या तांत्रिक बाबी कष्टपूर्वक साध्य केल्या होत्या. त्यावर त्यांची हुकूमत होती.
पहिला बोलपट ‘आलमआरा’प्रकाशीत होण्याआधी ध्वनीची चाचणी घेण्यासाठी लघुपटांना ध्वनीची जोड देण्यात आली. कोलकात्याच्या मादन थिएटर्सने मुन्नीबाईचे ‘अपने मौला की मैं जोगन’ हे गाणे असलेला लघुपट ४ मार्च १९३१ ला मुंबईत प्रकाशित केला. ‘हेल हर्बल’ या विदेशी चित्रपटाबरोबर तो दाखवला जायचा. ‘आलमआरा’ १९ मार्च १९३१ ला मुंबईच्या मॅजेस्टिक सिनेमात प्रकाशित झाला. त्याचे ध्वनिलेखक रुस्तम भरूचा यांनी सांगितले आहे, की त्यावेळी ध्वनि मुद्रित करण्यासाठी ‘बूम’नव्हता. मायक्रोफोन दिसणार नाही अशा पद्धतीने लपवून ध्वनिमुद्रण करावे लागायचे. साऊंड प्रुफ स्टुडिओ नव्हते. बाहेरचे आवाज येऊ नयेत म्हणून ‘आलमआरा’चे चित्रीकरण रात्री केले जायचे. इम्पीरिअल स्टुडिओ ग्रँटरोड स्टेशनजवळ होता. त्यामुळे रात्री रेल्वे बंद झाल्यावर शुटिंग सुरू होई.

‘आलमआरा’ने ‘बोलपट’युगाला आरंभ मुंबईत झाला. पुण्यात ‘प्रभात’, मुंबईत ‘बॉम्बे टॉकिज’ आणि कोलकत्यात ‘न्यू थिएटर्स’ या प्रबळ चित्रसंस्था सुरू झाल्या. या खेरीज छोट्यामोठ्या चित्रसंस्था म्हणजे ‘रणजित’, ‘मिनर्व्हा’ होत्याच, पण बोलपटयुगाच्या पहिल्या दशकात चित्रपटावर अधिराज्य गाजवले ते ‘प्रभात’, ‘न्यू थिएटर्स’ व ‘बाँम्बे टॉकिज’ या तीन चित्रसंस्थांनी. या तिघांत शांतारामबापूंनी चित्रपटभाषेचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रत्येक चित्रपटात केला. काही प्रमाणात देवकी बोसनीही प्रयत्न केला. ‘न्यू थिएटर्स’ व ‘बॉम्बे टॉकिज’ यांचे चित्रपट बहुश: मनोरंजनप्रधान होते.
बोलपटयुगाच्या पहिल्या दशकाविषयी लिहिताना सत्यजित रायनी लिहिले होते, ‘कलादृष्ट्या महाराष्ट्र बंगालहून खूपच पुहोता.’ राय यांनी हे विधान केले त्यावेळी त्यांच्या नजरेसमोर ‘प्रभात’चे चित्रपट होते. ‘बॉम्बे टॉकिज’चे नव्हते.

मुंबई हे हिंदी सिनेमाचे केंद्र. त्याचप्रमाणे प्रादेशिक सिनेमाही विविध भाषिक राज्यांत निर्माण होऊ लागले. बंगाली-मराठी या भाषांत सिनेमा प्रारंभापासूनच होता. पण नंतर अन्य भाषांतही सिनेमाचा विस्तार झाला.

मुंबईत हिंदीबरोबरच मराठी चित्रपट निर्माण व्हायचे. गुजराती चित्रपटांची पायाभरणीही मुंबईतच झाली. मायाशंकर भट्ट हे गुजराती गृहस्थ फाळक्यांच्या हिंदुस्थान फिल्म कं. चे भागीदार होते. त्यांचा भाचा भोगीलाल दवे हा अमेरीकेत जाऊन न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी मधे छायालेखन शिकून १९२३ ला परत आला. त्याने सत्तर-ऐंशी मूकपट ‘शारदा फिल्म कं.’ साठी निर्माण केले. त्यांचा विशेष गाजलेला मूकपट ‘बाजीराव मस्तानी’. त्याचे दिग्दर्शन भालजी फेंरांचे होते. द्वारकादास संपत यांनी कोहिनूर फिल्म कंपनी १९१८ साली स्थापन करून ‘विश्वामित्र मेनका’ हा पहिला मूकपट निर्माण केला. संपतचा स्टुडिओ मुंबईत फाळके यांनी पहिला मूकपट तयार केला तेथून हाकेच्या अंतरावर होता. चंदुलाल शहा, नानुभाई वकील, गोवर्धन पटेल, धीरुभाई देसाई, नंदलाल जसवंतलाल या गुजराती लोकांनी मूकपट जमान्यातच चित्रपट दिग्दर्शित केले. ‘सागर मुव्हीटोन’ने ‘नरसी मेहता’हा पहिला गुजराती चित्रपट निर्माण केला. त्याचे दिग्दर्शक नानुभाई वकील होते. प्रमुख भूमिका मा. मनहर बर्वे यांची होती. गुजराती चित्रपट व्यवसाय प्राय: मुंबईत होता. बोलपटयुग आल्यावर मुंबईत गुजराती चित्रपट बनू लागले. चित्रपट व्यवसाय म्हणून गुजरात राज्यात उभा राहिलाच नाही; आजही नाही. फक्त उंबरगावला एक स्टुडिओ आहे. तेथेच गाजलेली ‘रामायण’ ही हिंदी सिरीयल बनली.

या तुलनेने दक्षिणेतील राज्यात सिनेमाने व्यवसायाचे रूप धारण केले. १९१६ साली म्हणजे फाळक्यानंतर तीन वर्षांत मद्रासला के. नटराज मुदलियार यांनी ‘कीचकवधम्’ हा पहिला मूकपट कादक्षिणेतला सारा चित्रपट व्यवसाय १९५० पर्यंत मद्रासमधे होता. तामीळ, तेलगू, कन्नड व मल्याळम् चित्रपट मद्रासला निर्माण व्हायचे. १९५० नंतर हैदराबाद (तेलगू), बंगलोर (कन्नड), त्रिवेंद्रम (मल्याळी) येथे स्टुडिओ झाले आणि मद्रास हे केवळ तामिळ चित्रपट निर्मितीचे केंद्र बनले.

दक्षिणेचा चार भाषांतला एकूण चित्रपट व्यवसाय हा हिंदी सिनेमाच्या कितीतरी पट अवाय आहे. दाक्षिणात्य लोकांमध्ये चित्रपट वेड जरा जास्तच आहे. तेथे अनेक स्टार्स जन्मले. चित्रपटांना प्रेक्षक प्रचंड. यामुळे कोट्यवधी रुपयांची उलादाक्षिणात्य चित्रपट व्यवसायात चालते. नंतर आसाम व ओरिसा येथे छोट्या प्रमाणात चित्रपट व्यवसाय उभा राहिला. पहिला उडिया बोलपट ‘सीमा विवाह’ मोहनदास यांनी १९३४ मधे दिग्दर्शित केला. मग त्यानंतर पंधरा वर्षांनी उडिया चित्रपट सुरू झाले. तर प्रसाद अगरवालनी ‘जोयमती’ (१९३५) हा पहिला आसामी चित्रपट दिग्दर्शित केला. अन्य भाषांत म्हणजे छत्तीसगपंजाबी, राजस्थानी इ.भाषांत वर्षात एखाद दुसरा चित्रपट बनतो. पण या सर्व भाषिकांना हिंदी भाषा येत असल्याने तेथे चित्रपट व्यवसाय रुजू शकला नाही.
भारतीय सिनेमा, मग तो हिंदी भाषेतला असो किंवा प्रादेशिक भाषेतला असो, त्याला पारंपरिक सिनेमा असेच म्हटले पाहिजे. सिनेमातली ही परंपरा एकूण भारतीय संस्कृतीच्या प्रचलीत परंप्ारेतून आलेली आहे. नॅरेटिव्ह म्हणजे कथानात्म शैली हा तिचा स्थायिभाव आहे. भारतीय नाट्यशास्त्राने नवरसांची कल्पना राबवली, तीच पुचित्रपटांनी उचलली. भारतीय बहुसंख्य दिग्दर्शकांची प्रतिभा आणि परिश्रम, या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमात भारतीय परंपरा गुंफायची यासाठी खर्ची पडले. महाभारत, रामायण, पुराणे म्हणजे सत्य आणि असत्य यांच्या झगड्यातील कहाणी सांगतात. अपरिहार्यपणे सिनेमात नायकाबरोबर खलनायकही आला. स्वाभाविकच या तरल माध्यमात आला. रंजनमूल्य महत्त्वाचे मानल्यानें गाणी आणि नृत्ये आली. चित्रपट म्हणजे ‘अ‍ॅक्शन’ यासाठी फाइट्स आल्या. यांचा एक फॉर्म्युला बनला-त्याच्याबाहेर जाणार्‍या चित्रपटांना अपयशाला सामोरे जावे लागले.

भारतीय सर्वसामान्य प्रेक्षक हा वृत्तीनं परंपरावादी राहिला आहे. पं. नेहरूंनी मोठमोठ्या धरणांना आधुनिक तीर्थक्षेत्रे असे म्हटले खरे पण नेहरूंचा हा नवा विचार सर्व सामान्य माणसानें खर्‍या अर्थाने कधीच स्वीकारला नाही. त्याला काशी-मथुरा-रामेश्वर ही जुनी तीर्थक्षेत्रेच प्रिय आहेत. प्रेक्षक परंपरावादी म्हणून भारतीय चित्रपट परंपरावादी राहिला आहे. हा परंपरावाद सर्व भारतीय भाषांतील चित्रपटात भरून राहिला आहे. थोडेफार प्रादेशिक फरक आहेत; पण एकूण तोंडवळा तोच.
कालानुरूप प्रेक्षकांची समज विकसत होत गेली, त्यामुळे काही बदल घडत गेले. उदाहरणार्थ १९६० आणि ७० च्या दशकात सिनेमात मुख्य कथेच्या जोडीला कॉेमेडी ट्रॅक जोडलेला असायचा. त्यातला विनोद बर्‍याच वेळा बाष्कळ असायचा. त्यातून मेहमूद, जॉनी वॉकर, आगा, मुक्री असे कॉमेडियन पडद्यावर आले. त्यांचे भाईबंद प्रादेशिक चित्रपटांत आले. कॉमेडी ट्रॅक चित्रपटातून १९८० नंतर नाहीसा झाला. एकविसाव्या शतकाच्या आरंभी गाण्यांची संख्या आठवरून चारवर आली आहे. असे कालानुरूप कांही संकेत बदलले. पण परंपरागत भारतीय सिनेमाचे स्वरूप तेच राहिले.
विज्ञान,मानसशास्त्र,लोकशाही राज्य पद्धती यामुळे वास्तववाद हा युरोपीय कलेत निर्माण झाला. वास्तववादाची परंपरा भारतीय कलाक्षेत्रांत जवळ-जवळ नाही. नाटकसुद्धा ‘भिन्नरुचीच्या जनांंसाठी’,ही आपली परंपरा आहे. यासाठी भारतीय सिनेमात वास्तववाद आला नाही.

समांतर सिनेमाने परंपरागत सिनेमाची चौकट बदलण्याचा यत्न केला. त्याचा विचार स्वतंत्र प्रकरणात करुया. स्टुडिओ सिस्टिम मध्ये नटांना पगार असत. संबंधित नटनटी त्या त्या स्टुडिओचे नोकर असत. पण १९५० नंतर पगार-पद्धत बंद झाली. प्रिâलान्सिंग पद्धत सुरू झाली. सिंगल प्रोड्यूसर्स उभे राहिले. ते स्टुडिओ भाड्याने घेऊ लागले. मद्रासला एस. एस. वासन यांचा जेमिनी स्टुडिओ आणि ए. व्ही. मैय्यपन यांचा ए.व्ही. एम. स्टुडिओ हिंदी चित्रपट निर्मितीत मोठ्या प्रमाणावर उतरले. मुंबई–कोलकत्यापाठोपाठ मद्रास (आता चेन्नई) हे हिंदी सिनेमा निर्मितीचे तिसरे केंद्र उभे राहिले. मुंबईत बिमल रॉय, गुरुदत्त हे कलावंत-दिग्दर्शक स्वत:चा स्टुडियो ठेवून प्रिâलान्स पद्धतीने कार्यरत होते.

फिल्म सेंटरची ईस्टमनकलर लॅब १९६१ साली मुंबईत सुरू झाल्यावर हिंदी आणि नंतर अन्य भाषिक सिनेमांतही रंगांचे युग आले. रंगीत चित्रपटांमुळे सिनेमाचा प्रेक्षक आणखी वा१९६१ ते १९८१ या दोन दशकात प्रेक्षक सतत वाच होता. भारतीय सिनेमाचे आर्थिक दृष्ट्या ते सुवर्णयुग म्हटले पाहिजे. देशात तेरा हजार चित्रपटगृहे तेव्हा होती.

१९८४ मधे रंगीत टेलिव्हिजन आणि व्हिडियो आल्यावर सिनेमाचे ‘एकमेव दृक्जनमाध्यम’ हे बिरुद धोक्यात आले. सिनेमाचा पन्नास टक्के प्रेक्षक कमी होऊन टेलिव्हिजनकडे वळला.
टेलिव्हिजनच्या आक्रमणामुळे जगभरच्या सिनेमासमोर स्पर्धा उभी राहिली. तशीच ती भारतीय सिनेमासमोरही उभी राहिली. व्हिडियोमुळेही सिनेमाचा थिएटरमधे येणारा प्रेक्षक घटला. चित्रपट व्यवसायाने त्यावर उपाय शोधले. मल्टिप्लेक्स थिएटर्सचा आसरा घेणे, एकाच वेळी सर्व मोठ्या शहरांतून चित्रपट प्रकाशित करणे अशा क्ऌप्त्या लसिनेमा व्यवसायाने टेलिव्हिजन स्पर्धेवर मात केली. पण पन्नास टक्के प्रेक्षक टेलीव्हिजनमुळे कमी झाला तो झालाच. स्वाभाविकच रोजचा खेळ हे गणित बदलले. मल्टिप्लेक्स मधे चार खेळांना वेगवेगळे चित्रपट दाखवले जाऊ लागले.
तांत्रिक प्रगती आणखी एका तर्‍हेने सिनेमाला सहाय्यभूत ठरली. ती म्हणजे सॅटेलाइटवरून चित्रपट डाऊनलोड करून भारतभरच्या सिनेमागृहात दाखवण्याची टेलिव्हिजनसारखी सोय उपलब्ध झाली. महानगराबाहेरच्या अनेक थिएटर्सनी ‘डाउनलोड’ करून चित्रपट दाखवायची सुविधा करून घेतली. त्यामुळे प्रत्येक रंगीत प्रिंटवर होणारा सत्तर/ऐंशी हजार रुपये खर्च कमी करणे आणि एकाच आठवड्यात अनेक ठिकाणी सिनेमा प्रदर्शित करणे शक्य झाले.

भारतात सोळा भाषांत वर्षाला हजार ते अकराशे चित्रपट निर्माण होतात. सर्वाधिक चित्रपट निर्माण करणारा देश हे भारताचे अव्वल स्थान १९७३ सालापासून अबाधित आहे! जपान व हॉलीवूड यांना अव्वल स्थान परत मिळविता आलेले नाही.

ज्येष्ठ लेखक सुधीर नांदगावकर

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  नरेंद्र चौधरी


  आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया