‘टकाटक’मध्ये काहीच अश्लील नाही
——
‘टकाटक’ चित्रपटाचं कथानक मी आणि अजय ठाकूर मिळून लिहिली. सुरुवातीला आपल्याला काय करायचंय याच्यावर आम्ही बरीच चर्चा केली. त्यानंतर वन पेज स्टोरी लिहिली. ती चांगली जमलीय असं वाटल्यावर मग त्याची पाच पानं केली. आपण जे काही लिहिलंय ते वाचायचो तेव्हा आमच्या दोघांच्याही तोंडून एक वाक्य निघायचं की, ‘ये फिल्म बननी चाहिए’. परंतु, या चित्रपटामधला आशय साकारण्यासाठी आम्हाला जिगरवाला निर्माता आणि जिगरवाले कलाकार तसेच तंत्रज्ञ मंडळी हवी होती. सगळंच टकाटक जुळून आल्यामुळे फिल्म चांगली झालीय. ‘टकाटक’ ही फॅमिली अडल्ट फिल्म आहे. त्यात व्हल्गर असं काही नाहीये. ही आजच्या तरुणाईची फिल्म आहे. कारण यातली चारही पात्रं ही तरुण आहेत.
गेल्या जानेवारी महिन्यात आम्ही हा चित्रपट पूर्ण करून कमीत कमी ८० ते ९० लोकांना प्रदर्शनापूर्वीच दाखवला होता. या लोकांमध्ये कॉलेजमधील तरुण मुलं, महिला यांचाही समावेश होता. तसेच प्रवीण निश्चल, गोविंद निहलाणी यांच्यासारखी दिग्गज मंडळीदेखील हा चित्रपट पाहायला आली होती.
गोविंद निहलाणींसारख्या दिग्गज दिग्दर्शकानं हा चित्रपट पाहणं आणि त्याचा धाडसी प्रयोग असा उल्लेख करून चित्रपट आवडल्याचंही भाष्य करणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. निहलाणी हे स्वतः एक प्रतिभाशाली दिग्दर्शक आहेत. राष्ट्रीय पुरस्कार समितीचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे. त्यामुळे ते कोणत्याही सिनेमाला चांगलं म्हणणार नाहीत. त्यांना स्वतःलाही आपण सुरुवातीला हा चित्रपट पूर्ण पाहू की नाही याची कल्पना नव्हती. परंतु, मगाशी सांगितल्याप्रमाणं १२व्या मिनिटांनंतर ते या चित्रपटात गुंतले ते शेवटपर्यंत. एवढंच नव्हे तर चित्रपट संपल्यानंतरही त्यांनी आमच्या या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल बरंच काही जाणून घेतलं. त्यांच्या मनात खूप काही प्रश्न होते. त्या सर्वांची आम्ही उत्तरं दिली. ‘तुम्ही हसवत हसवत नेऊन आम्हाला कधी रडवलं ते कळलंच नाही,’ अशी प्रतिक्रिया प्रवीण निश्चल यांनी दिली. हा सिनेमा उथल नाही, त्यामागे आमचा तब्बल दीड वर्षांची रिसर्च आहे. मनोरंजनातून संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. त्यामुळे प्रेक्षकांचे नक्कीच पैसे वसूल होतील.
– मिलिंद कवडे
काही निवडक प्रतिक्रिया:
प्राध्यापक डॉक्टर सुजय पाटील कोल्हापूर
लेखिका जयश्री दानवे यांनी बेबीनंदा यांच्याविषयीचा लेख अप्रतिम पद्धतीनं सादर केलेला आहे . विविध संदर्भांचा मुळे हा लेख वाचनीय झालेला आहे.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया