‘वन्स मोअर’मधील ‘व्हीएफएक्स’ उच्च दर्जाचे – विष्णु मनोहर
——
मी खाद्यप्रांतात रमलो असलो तरी मला अभिनयाच्या क्षेत्रातच करिअर करण्याची इच्छा होती. इच्छा दांडगी असेल तर ती पूर्ण होतेच. माझी अभिनयाची ओढ आता ‘Once मोअर’ चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे. या चित्रपटात मी एका राजाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या भूमिकेसाठी राजाच्या देहबोलीचा अभ्यास मी केला, त्यासोबत दिग्दर्शक नरेश बिडकर व सहकलाकार यांचं खास मार्गदर्शन मला या भूमिकेसाठी मिळालं. प्रत्येक सहकलाकाराने मला सांभाळून घेतलं. माझ्या प्रत्येक सीननंतर मी सेटवर बसून चित्रीकरण बघायचो. त्यातील बारकावे जाणून घेतले.
या चित्रपटात माझ्यासोबत रोहिणी हट्टंगडी, पूर्णिमा तळवलकर, भारत गणेशपुरे, नरेश बीडकर आशुतोष पत्की आणि धनश्री दळवी आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे लेखन श्वेता बिडकर यांनी केले आहे. धनश्री विनोद पाटील, सुहास जहागीरदार, निलेश लवंदे, विष्णू मनोहर आणि डॉ. विनित बांदिवडेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभय ठाकूर, सुदिप नाईक, संपदा नाईक आणि व्ही.टी एच.एटंरटेन्मेंट सहनिर्माते आहेत. थोडक्यात, खूप मेहनतीने, प्रेमाने, जिद्दीने आम्ही हा चित्रपट बनवला आहे. प्रेक्षकांच्या तो पसंतीस उतरेल याची आम्हाला खात्री आहे.
– विष्णु मनोहर
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया