अतिथी कट्टा

दिनांक : १०-०२-२०२०

‌‌‌‌‌‌‌‌‌मराठी चित्रपट खूप आधी करायला हवा होता – चंकी पांडे



हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडे ‘विकून टाक’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. त्यानिमित्तानं त्याचं हे मनोगत.

——

मी वाढलो मुंबई-महाराष्ट्रात. माझे वडील मराठी आहेत. तरीदेखील मला मराठी चित्रपट करण्यासाठी तब्बल ३२ वर्षं लागली. तसं पाहायला गेलं तर मला इतक्या वर्षांमध्ये काही मराठी चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या. परंतु, त्यात मला काही करण्यासारखं नव्हतं. एखादं गाणं, दोन-चार प्रसंग वगळता इतर काहीच त्यात नव्हतं. त्यामुळे मराठी चित्रपट करण्याची इच्छा असूनदेखील माझी निराशा झाली. अखेर समीर पाटील हे माझ्याकडे ‘विकून टाक’ हा चित्रपट घेऊन आले. या चित्रपटाचं कथानक ऐकल्यानंतर एका सेकंदात मी होकार दिला नि केव्हापासून शूटिंग सुरू करायचं असा त्यांना प्रश्न विचारला. एवढी या चित्रपटामधील भूमिका मला आवडली होती.

या चित्रपटाची भूमिका ऐकल्यानंतर मी तब्बल तीन दशकं मागे, फ्लॅशबॅकमध्ये गेलो. १९८८ मध्ये मी ‘तेजाब’ नावाचा चित्रपट केला होता. त्यामध्ये मी जॉनी लिव्हरसमवेत लोठिया पठाणचा बॅंड वाजवला होता. या चित्रपटामध्ये मी एका अरबाचा गेटअप धारण केला होता. परंतु, त्याचा बोलण्याचा ढंग तेलुगु होता. ‘विकून टाक’मध्ये मी अरबी माणूस मराठीच्या लहेजाने साकारला आहे. या व्यक्तिरेखेवर आमचे दिग्दर्शक समीरभाईंनी खूप मेहनत घेतली नि मग मी ती माझ्या पद्धतीनं साकारली. तब्बल १५ दिवस मी चित्रीकरणामध्ये सहभागी झालो होतो. ज्या वेळी माझं चित्रीकरण नसायचं तेव्हाही मी सेटवर उपस्थित राहायचो. मराठी कलाकारांचं विनोदाचं टायमिंग, इम्प्रोव्हायझेशन अफलातून आहे. ते पाहून मला माझी भूमिका साकारताना खूप लाभ झाला. एकंदरीत या चित्रपटात काम करण्याचा अनुभव एवढा चांगला होता, की यापूर्वीच आपण मराठी चित्रपटांमध्ये काम करायला हवं होतं असं मला वाटून गेलं. खूप धमाल आहे या चित्रपटात. मला विचाराल तर आपल्यातला स्वार्थ, इगो आपण विकून नाही तर देऊन टाकला पाहिजे. भविष्यातही चांगल्या मराठी भूमिका मिळाल्या तर मी आणखी बऱ्याच चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेन.

– चंकी पांडे

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया