अतिथी कट्टा

दिनांक : ३०-११-२०१८

‌‌‌‌‌‌‌‌‘पर्सनल अॅप’मुळे मी चाहत्यांच्या अधिक जवळ
मराठी चित्रपटसृष्टीच नव्हे तर सध्याच्या काळात येथील कलावंतदेखील तेजीमध्ये आहेत. विजय पाटकर हे त्यापैकीच एक नाव. हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखविणाऱ्या पाटकर यांनी काही चित्रपटदेखील दिग्दर्शित केले आहेत. गेल्या तीन दशकांचा त्यांचा प्रवास आहे. त्यामुळेच ‘किनशिप’ सॉफ्टवेअर कंपनीनं त्यांचा पर्सनलाइज्ड अॅप सुरू केला आहे. त्यानिमित्त पाटेकर यांचं हे मनोगत.

——

आपल्या स्वत:च्या कामाचं अॅप्लिकेशन सुरू होणं, ही खरोखरीच माझ्यासाठी अतिशय आनंदाची तसेच अभिमानाची गोष्ट आहे. माझ्याकडे सांगण्यासारखं खरंच खूप काही आहे. हे मी माझ्या कामाचे जुने फोटो, व्हिडीओ यांच्या रुपातून चाहत्यांसमोर सादर करणार आहे. आताचा काळ झपाट्यानं बदलतोय. आजची नवीन पिढी वाचतीय कमी आणि बघतीय जास्त. त्यामुळे अधिकाधिक व्हिडीओ ‘अपलोड’ करण्यामागे माझा कल राहील. मी स्वत: दारासिंग, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांचे चित्रपट पाहून मोठा झालो आहे. त्यावेळी जे काही पाहिलं आणि प्रत्यक्ष काम केलं त्याच्या अनुभवामधूनच मी अभिनेता-दिग्दर्शक म्हणून घडलो. आजवर इतकं काम करूनही माझे पाय जमिनीवर आहेत.

माझ्या डोक्यात जराही हवा गेलेली नाही. त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे मी निर्माता होणं. प्रत्येक नटानं आपल्या कारकिर्दीत सुरुवातीच्याच टप्प्याला निर्माता व्हावं असं मला वाटतं. तसं घडलं तर त्या कलावंताच्या डोक्यात हवा जाणं शक्यच नाही असं मला वाटतं. जी गोष्ट मला स्वत:ला जमली नाही, ती आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सतत काम करा, यश तुमचंच आहे हा माझ्या कारकिर्दीचा सक्सेस मंत्र आहे. हीच गोष्ट मी माझ्या अॅपद्वारे सतत सांगत राहणार आहे. या अॅपचं उद्घाटन मी प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या हस्ते नुकतंच एका कार्यक्रमात केलं. अनेकांनी मला विचारलं की तू सिद्धार्थच्याच हस्ते उद्घाटन का केलंयस. त्यामागे एक ठोस कारण होतं. अलीकडेच मी ‘सिम्बा’ चित्रपटाच्या निमित्तानं सिद्धार्थबरोबर काम केलंय. यावेळी सेटवर मी त्याला अनेकदा मोबाईलवर पाहिलं. नवनवीन गोष्टी तो मला दाखवायचा. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की, नवीन पिढीबरोबर राहण्यासाठी प्रत्येक कलाकारानं आपलं वय विसरून तंत्रज्ञानाची मदत घेतली पाहिजे. तो मला ‘ज्युनिअर’ असला तरी त्याचा ‘डिजिटल अॅप्रोच’ मला अधिक भावला. तो ‘टेक्नोसॅव्ही’ आहे. म्हणूनच आपल्या अॅपचं लॉंचिंग सिद्धार्थच्या हस्ते करायचं मी ठरवलं. या अॅपमध्ये माझ्याबद्दलची सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीचा संघर्ष आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. त्यामधूनच मी खूप काही शिकत गेलो. त्याबद्दलची माहिती, किस्से, आठवणी मी माझ्या चाहत्यांबरोबर शेअर करणार आहे. तसेच माझ्या भविष्यातील प्रोजेक्टसचीदेखील मी माहिती देणार आहे. तसेच काही प्रसंगांनिमित्तानं मी चाहत्यांशी ‘लाइव्ह’ संवाददेखील साधणार आहे. त्यामुळे आतापर्यंत माझ्यापासून लांब असलेला प्रेक्षकवर्ग माझ्या खूप जवळ येईल. इतर सोशल माध्यमांमध्ये मी अपलोड केलेला कन्टेंट पाहण्यासाठी चाहत्याला त्रास होतो. ‘फेसबुक’ आणि ‘व्हॉट्सअप’च्या गर्दीत कन्टेट हरवला जातोय. परंतु, या माझ्या पर्सनल अॅपमुळे माझा कोणताही कन्टेन्ट प्रेक्षकवर्ग कधीही पाहू शकणार आहे.

– विजय पाटकर

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  धन्वंतरी परदेशी

  संध्याजींच्या फेसबुक पोस्टवर आलेली प्रतिक्रिया

  पिंजरा चित्रपटाने काळ गाजवला,अप्रतिम भूमिका,संध्या आणि डॉ,श्रीराम लागू यांची,उत्कृष्ट कथानक,जगदीश खेबुडकर यांची गाणी अजूनही लाजवाब ,व्ही, शांताराम बापू यांचे दिग्दर्शन अप्रतिम असा चित्रपट होणे नाही.

  संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया