अतिथी कट्टा

दिनांक :

आठवणी `आलिया भोगासी`च्या…

कार्यक्रम चालूच आहेत. दोन वर्षामागे त्याने एक चित्रपटही निर्माते लाड यांच्यासाठी पुरा केला आहे.
——–

रामदास जिद्दी आहे हे असे म्हणणे ही द्विरुवली तर ठरणार नाहीना इतके रामदासचे जीवन संघर्षाने भरलेले आहे. अर्थात हा संघर्ष राजकीय नसून कलाप्रांतातला आहे. समाजहिताचा विचार हा रामदासचा स्थायीभाव आहे. आणि याच हेतूने त्याचा कलाक्षेत्रातला आजवरचा प्रवास चालू आहे. समाजाचे हित, हा विचार म्हणजे रामदास समाजसुधारकाच्या भूमिकेत वावरतो असे नाही. कलेच्या माध्यमातून समाजाला प्रगतीकडे नेण्याचा उद्योग हा त्याचा स्थायीभाव आहे. जिद्द आहे.
साठच्या दशकात रामदास नगर जिल्ह्यातून ड्रॉइंग टीचर म्हणून मुंबईच्या मारवाडी विद्यालयात दाखल झाला. मुंबई महानगर त्याला अनेक अंगानी खुणावत होते. मराठी प्रमाणेच त्याचे हिंदी भाषेवरही प्रेम आहे. यासाठी त्याने मारवाडी विद्यालयातील मुलांना चित्रकला शिकवत असतानाच ‘ऋतुराज’ हे हिंदी मासिक काढले. काही वात्रटिका लिहायला सुरवात केल्या. पण त्याच्या एवूâण उत्साहाला मासिकाचा प्रपंच तोकडा वाटत असावा.
मुळात चित्रकार असल्याने सिनेमाकडे त्याचे लक्ष वेंâद्रीत होणे हे स्वाभाविक होते. सत्तरच्या दशकात मराठी सिनेमा हिंदीच्या स्पर्धेने व प्रेक्षक कमी असल्याने एक प्रकारे कोंडीत सापडलेला होता. कौटुंबिक, तमाशा आणि विनोदी अशा तीन विषयावरच चित्रपट निघत होते. पडत होते. एखादाच चित्रपट निर्मात्याला पैसे परत मिळवून देत होता. हिंदीत कलर चित्रपटांचे युग सुरू होऊन दहा वर्षे उलटली होती पण आर्थिक डबघाईमुळे मराठी निर्माते रंगीत चित्रपटांचा विचारही करू शकत नव्हते.
या पाश्र्वभूमीवर रामदासने चित्रपट क्षेत्रांत उतरायचे ठरविले. पण निर्मितीचा अजिबात अनुभव नव्हता. म्हणून दादा कोंडकेच्या युनिटमध्ये ‘सोंगाड्या’ नंतर रामदास निर्मिती सूत्रधार म्हणून सामील झाला. तो काळ असा होता की कोणीही सुशिक्षित तरुण मराठी चित्रपट व्यवसायात येत नव्हता. कारण काही भवितव्यच नव्हते. दादांच्या चित्रपटाच्या शुटींगच्या निमित्ताने रामदासच्या कोल्हापूरच्या पेâNया सुरू झाल्या. भालजी पेंढारकरांच्या ‘जयप्रभा’ स्टुडिओत दादांच्या चित्रपटाचे शुटींग व्हायचे. रामदासची भेट भालजींशी झाली. भालजीना सारा चित्रपट व्यवसाय बाबा म्हणतो. बाबांनी रामदास सारखा सुशिक्षित तरुण मराठी सिनेमात आला म्हणून त्याचे कौतुक केले. दादांच्या चित्रपटाच्या मुहूर्ताचे पेढे रामदासने बाबांना स्टुडिओतील पहिल्या मजल्या वरील त्यांच्या घरी नेऊन दिले.
दादा कोंडकेच्या युनिट मधे एक दोन चित्रपटांच्या निर्मितीचा अनुभव गाठींशी आल्यावर रामदासने स्वत:च चित्रपट निर्माण करायचे स्वप्न पहायला सुरवात केली.
दादांच्या युनिटमधे रामदासने निर्मितीचा कार्यानुभव घेतला होता. दिग्दर्शनाचे धडे घेतले नव्हते. त्यामुळे स्वत: दिग्दर्शन करण्याचे धाडस त्याच्या पाशी नव्हते. विजय तेंडुलकरांना रामदास कथे-पटकथेसाठी जाऊन भेटला. तेंडुलकरांनी प्रथम कथा सांगीतली नाही फक्त एवढेच सांगीतले की निळु पुâले आणि डॉ. लागू यांच्या अभिनयाची जुगलबंदी करणारी कथा तुला देईन.
रामदासचा पुढचा प्रश्न होता, तुम्ही लिहाल ते मी पडद्यावर आणिनच पण दिग्दर्शन कोणाला द्यायचे?
तेंडुलकर म्हणाले ‘नवा दिग्दर्शक हवा ! जब्बार पटेलांना विचार. त्याला सिनेमात यायचे आहे.’
रामदास मग पुढच्या उद्योगाला लागला. मुख्य म्हणजे भांडवल उभे केले पाहिजे. कथालेखक, दिग्दर्शक निश्चित करण्याआधी पैशाची व्यवस्था महत्त्वाची होती.
रामदास तेव्हा गिरगांवातील फणसवाडीत रहात होता. त्याच्या घरी फोनही नव्हता. कोणाला फोन करायचा तर बाहेर हॉटेलमधला फोन वापरुन करायचा. इथपासूनच रामदासच्या जिद्दीची कसोटी सुरू झाली. अडचणीवर मात केल्याशिवाय चित्रपट पूर्ण होणार नाही याची रामदासला पुरेपूर कल्पना होती.
भांडवल, दिग्दर्शक, नट मंडळी जमविल्यावर म्हणजे त्यांच्याशी बोलून झाल्यावर रामदास तेंडुलकरांना पुन्हा भेटला. तेंडुलकरांनी ‘सामना’च्या कथेची रुपरेखा सांगीतली. रामदास नगर जिल्ह्यातला. त्या जिल्ह्यात सहकारी साखर कारकान्यांचे चेअरमन रामदासने पाहिलेले होते. त्यालाही कथा ओळखीची वाटली.

चेअरमन निळु पुâले आणि गांधीवादी पण नैराश्याने ग्रासलेला दारू पिणारा मास्तर डॉ. लागू ही कास्ट निश्चित झाली.
निर्मितीसाठी पायाला भिंगरी लावून आणि पब्लीक टेलीफोनवरुन रामदासची भ्रमन्ती सुरू झाली. तुटपुंजे भांडवल ही सतत छळणारी डोकेदुखी; भरीला होतीच पण रामदासची जिद्द जबरदस्त होती. कोणतीही अडचण येवो. अडचणीशी सामना करत करत अखेरीला ‘सामना’ पूर्ण झाला. मुंबईत प्रकाशीत झाला. पण पूर्व प्रसिद्धी अभावी प्रेक्षकांना ‘सामना’ तमाशा प्रधान चित्रपट असणार अशी समजूत झाली. मुुंबईत ‘सामना’ फारसा प्रेक्षकांनी उचलून धरला नाही.
एके दिवशी सांगलीच्या सभेत शालीनीताई पाटील यांनी ‘सामना’वर टीका केली. साखर कारखानदारांचे विकृत चित्रण असा शेरा मारून त्यावर महाराष्ट्र सरकारने बंदी घालावी अशी जोरदार मागणी केली. त्याबरोबर सुशिक्षित प्रेक्षकांचे लक्ष ‘सामना’ कडे गेले. आणि ‘सामना’ पहायला प्रेक्षक चित्रगृहात गर्दी करू लागला. अन्य मराठी चित्रपटातून ‘सामना’ वेगळा आहे याची जाण येऊ लागली. डॉ. लागू व निळु पुâले यांच्या अभिनयाचे कौतुक होऊ लागले.
एवढ्यात भारत सरकारने बर्लीनचे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘सामना’ पाठविला. बर्लीनला जाण्यासाठी पैसे उभे करण्यासाठी रामदासने महाराष्ट्र सरकारला साकडे घातले. बर्लीन महोत्सवात तो पर्यंत कोणताच मराठी सिनेमा गेलेला नव्हता.
वेगळा मराठी सिनेमा काढायचा या रामदासच्या ध्यासाला बर्लीन महोत्सवातील प्रवेशिकेने यशाचा तुरा खोवला. त्याच वेळी करपरतीच्या योजना मराठी सिनेमासाठी शासनाने सुरू केल्यामुळे पुढच्या सिनेमासाठी भांडवल उपलब्ध झाले. आणि रामदासने ‘सर्वसाक्षी’ (१९७८) हा अंधश्रद्धे विरूद्धचा चित्रपट स्वत: दिग्दर्शित केला.
पण दुसरा सिनेमा काढेपर्यंत रामदास स्वस्थ बसला होता असे नाही. त्याच्या वात्रटिकांतून तो समाजातील ढोंगावर प्रहार करतच होता. गप्पा मारता मारता तो म्हणाला ‘काँग्रेसचा प्रवास साबरमती ते बारामती असा झाला आहे’ बारामती म्हणजे शहर पवारांचा मतदार संघ.
शरद पवारांनी दलीतांची मते मिळविण्यासाठी जेव्हा रामदास आठवलेंशी युती करून आठवलेंना राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून पाठविले तेव्हा. रामदासने वात्रटिका लिहली.
आम्हालाही आठवले, आमचे नांव रामदास आहे पण दलित नसल्यामुळे वनवास आहे.
राजकारणातील ढोंगावर प्रहार करणे हे रामदासच्या वात्रटिकांचे मुख्य लक्ष.
अशा अनेक वात्रटिका आणि कविता एकत्र करुन रामदास मुंबई पुण्याच्या बाहेर दहा-दहा हजार श्रोत्यांसमोर कवितावाचन करुन श्रोत्यांना गुंगवून ठेवतो. भारतीय जनता पार्टीच्या मंचावर येऊन मा. अटलबिहारी वाजपेयी या कविमनाच्या राजकारण्यासमोर आपल्या हिंदी वात्रटिका श्रोत्यांना ऐकविल्या रामदासच्या हिंदी वात्रटिकांना वाजपेयींनी दिलखुलास दाद दिली.
मराठीतल्या चांगल्या पुस्तकाला शासकीय पुरस्काराखेरीज अन्य पुरस्कार मिळाले पाहिजेत यासाठी त्याने दमाणी पुरस्कार सुरू केला. जागतिक मराठी अकादमीची धुरा खांद्यावर घेऊन रामदास गेली पंधरावर्षे अनिवासी भारतीयांची परिषद महाराष्ट्रात भरवितो. शासनाने जेव्हा अनुदान द्यायचे बंद केले तेव्हा स्वत: पैसे उभे करुन हा उपक्रम तो चालवतो आहे.
मधे कांही काळ काँग्रेसच्या तिकीटावर तो विधान परिषदेत आमदारही होता. त्याला उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्रातले सर्वेसर्वा शरद पवार रामदासला म्हणाले, ‘तुमचे ते वात्रटिका लेखन चालू राहू द्या’
या उद्योगात सिनेमा मागे पडला पण ती कसर रामदासने मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्षपद ४ वर्षे संभाळून भरून काढली. पाठोपाठ १९८५ साली ‘सुर्वंता’ हा त्याने दिग्दर्शित केलेला चित्रपट दिग्दर्शित केला. आणि पुन्हा साखर कारखान्यांच्या परिसरात जाऊन उस तोडणी कामगारांची दुखदकथा चित्रपटांत मांडली.
एवढे सारे होईपर्यंत रामदासनें वयाची सत्तरी ओलांडली. एकदा ‘हार्टअटॅक’ येऊन गेला. तरीही रामदासचे उद्योग चालूच राहिले. महाराष्ट्रातले राजकारण या विषयावर त्याने दोन वर्षापूर्वी ‘सरपंच’ चित्रपट दिग्दर्शित केला पण निर्मात्याने तो अजून प्रकाशीत केलेला नाही.
अमृत महोत्सवा निमित्त रामदासना शुभेच्छा.
–सुधीर नांदगावकर
ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया